शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे इंजिनमध्ये ‘बायो टॉयलेट’

By admin | Updated: February 25, 2017 00:10 IST

प्रवासी गाड्या, मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे इंजीनमध्ये चालकांसाठी आता जैव शौचालय (बायो टॉयलेट) बसविले जाणार आहे.

चालकांना दिलासा : रेल्वे बोर्डाचा निर्णयअमरावती : प्रवासी गाड्या, मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे इंजीनमध्ये चालकांसाठी आता जैव शौचालय (बायो टॉयलेट) बसविले जाणार आहे. चालकांची होणारी गैरसोय लक्षात घेता, रेल्वे बोर्डांने हा निर्णय घेतला आहे.रेल्वे गाड्या डिझेल आणि वीजेवर चालतात. मात्र रेल्वे इंजीनमध्ये तांत्रिक कारण पुढे शौचालय बसविता येणार नाही, असे गृहीत होते. पण, रेल्वे बोर्डांने या तांत्रिक अडचणींवर मात करुन पहिल्या टप्प्यात डिझेल रेल्वे इंजीनमध्ये बायो टॉयलेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी निसर्गाच्या हाकेला ओ देण्याकरिता चालकांना एक तर चालकांना रेल्वे स्थानकावर किंवा सिग्नलवर गाडी थांबल्यानंतर टायलेटचा आधार घ्यावा लागत होता. परंतु नव्या निर्णयानुसार चालकांनी आता गैरसोय होणार नाही. डिझेल इंजीनमध्ये बायो टॉयलेट बसविले जाणार आहे. त्यानंतर वीजेवर चालणाऱ्या इंजीनमध्ये बायो टॉयलेटचा प्रयोग राबविला जाणार असल्याचीे माहिती रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्यांनी दिली. कालांतराने डिझेल इंजीन हे वातानुकुलित केले जाणार असून त्यादिशेने रेल्वे बोर्डाने वाटचाल सुरु केली आहे. उशिरा का होईना रेल्वे चालकांना दिलासा मिळणार आहे. हल्ली उन्हाळा प्रारंभ झाला आहे. उन्हाळ्यात रेल्वे इंजीनमध्ये क्षणभरही थांबणे कठीण राहते. तथापि रेल्वे इंजीनमध्ये पंख्याची सोय असते. पण, ती पुरेशी नसल्याने उन्हाळ्यात चालकांच्या अंगातून घामाच्या धारा निघाल्याशिवाय राहत नाही. तरिदेखील चालक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गाडी नियोजीत वेळेवर पोहचवितात. रेल्वे इंजीनमध्ये वातानुकूलित यंत्रणा असावी, ही मागणी गत काही वर्षांपासून चालकांची आहे. मात्र आता इंजीनमध्ये बायो टॉयलेट, वातानुकुलित यंत्रणा बसविण्यास रेल्वे बोर्डाने सन २०१६ मध्ये मान्यता प्रदान केली आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी तसे संकेत दिले आहे. रेल्वे इंजीनमध्ये बायो टॉयलेट, वातानुकुलित यंत्रणा हा विषय औत्सुक्याचा ठरत आहे. रेल्वेच्या एका डब्यात चार टॉयलेट असून इंजीनमध्ये एकही टॉयलेट बसविण्यात आले नाही. त्यामुळे चालकांची गैरसोय होऊन त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सन २०११ मध्ये ग्वाल्हेर- बुंदेलखंड- वाराणसी एक्सप्रेसमध्ये पहिल्यांदा बॉयो टॉयलेट ही संकल्पना राबवण्यिात आली. त्यानंतर दुरांतो, राजधानी व शताब्दी या प्रतिष्ठित रेल्वे गाड्यांच्या इंजीनमध्ये बायो टॉयलेट ही संकल्पना सुरु करण्यात आली आहे. मात्र इंजीनमध्ये बायो टॉयलेट बसविण्यास सुरुवात झाली असून लवकरच डिझेल इंजीनमध्ये बायो टॉयलेट बसविले जाणार आहे.रेल्वे इंजिनमध्ये बायो टॉयलेट बसविले जाणार ही घोषणा रेल्वे मंत्र्यांनी अगोदरच केली आहे. परंतु या घोषणेला कधी मुहूर्तरुप येणार याची प्रतीक्षा चालकांना आहे. इंजिनमध्ये बॉयो 'टॉयलेट' आवश्यक आहे.- एस.एस. भटकर,लोको पायलट, बडनेरा