शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापनात ‘बायो मायनिंग’, नगरविकास खात्याचे नव्याने निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:15 IST

सुकळी कंपोस्ट डेपोसह बडनेरा व अकोली येथे प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ‘बायोमायनिंग’चा समावेश करण्याचे निर्देश नगरविकास खात्याने दिले आहेत.

अमरावती : सुकळी कंपोस्ट डेपोसह बडनेरा व अकोली येथे प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ‘बायोमायनिंग’चा समावेश करण्याचे निर्देश नगरविकास खात्याने दिले आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेला विस्तृत प्रकल्प आराखड्यात (डीपीआर) या नव्या प्रक्रियेचा समावेश करावा लागणार आहे. तद्वतच सुधारित डीपीआरला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नव्याने तांत्रिक मान्यता घ्यावी लागेल. त्यामुळे ४०.७० कोटींच्या प्रकल्प खर्चात वाढ अपेक्षित आहे. बायोमायनिंगचा समावेश न करता महापालिकेने नगरविकास खात्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी डीपीआर सादर केला होता. त्यावर बायोमायनिंगचे निर्देश देण्यात आले.  आॅक्टोबर २०१७ च्या आमसभेत सभागृहाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता दिल्यानंतर डीपीआर बनविण्याचे काम सुरु करण्यात आले. मार्स नामक कंपनीने डीपीआर तयार केला. मात्र तो ६० कोटींच्या घरात पोहोचल्याने त्यातून बायोमायनिंग हा खर्चिक भाग त्यावेळी वगळण्यात आला. बायोमायनिंग वगळून दोन महिन्यांपूर्वी ३८ कोटींचा डीपीआर तयार करण्यात आला. मात्र, त्यानंतर नगरविकास विभागाने महापालिकेने प्रस्तावित केलेल्या तीनही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या संभाव्य आराखड्यात अर्थात डीपीआरमध्ये काही सुधारणा सुचविल्या. त्यानुसार ४०.७० कोटी रुपयांच्या डीपीआरला मजीप्राकडून तांत्रिक मान्यता घेण्यात आली. राज्याच्या मुख्य सचिवांच्या उच्चाधिकार समितीने ४ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या या डीपीआरला तत्वत: मान्यता दिली. त्यामुळे आता प्रशासकीय मान्यतेचे सोपस्कार आटोपले की निविदा प्रक्रियेचा मार्ग मोकळा, अशी महापालिका प्रशासनाची भूमिका होती. मात्र चार दिवसांपूर्वी पुन्हा एकदा नगरविकास खात्याने महापालिकेने पाठविलेल्या डीपीआरमध्ये बायोमायनिंगचा समावेश करण्याचे निर्देश दिले. 

काय आहे बायोमायनिंग स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत तयार करण्यात येणा-या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या डीपीआरमध्ये अशा प्रकारे अनेक वर्षापासून साठविलेल्या कच-यावर बायोमायनिंग या शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करण्याचा समावेश करण्यात आला आहे. बायोमायनिंग प्रक्रियेने साठविलेल्या घनकच-याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.