शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

क्षेत्रीय तपासणी विमा कंपनीला बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

परतीच्या पावसाने दहा दिवसांत जिल्ह्यातील एक हजार ६०६ गावांमधील एक लाख ४७ हजार ९१९ हेक्टरमधील खरीप पिके उद्वस्त झालीत. यामध्ये ९५ हजार ८९९ हेक्टरवरील सोयाबीन, ४१ हजार ६९९ हेक्टरमधील कपाशी, ३ हजार १६३ हेक्टरमध्ये ज्वारी, ३ हजार ४६१ हेक्टरमध्ये धान, ७२० हेक्टरमध्ये तूर, १८३ हेक्टरमध्ये मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकृषी आयुक्तांची माहिती : पालकमंत्री, आमदार पोहोचले शेतशिवारात

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १७ ते २७ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या परतीच्या पावसाने खरिपाची पिके बाधित झाली. नुकसानभरपाईचा लाभ मिळावा, यासाठी विमा कंपनीकडे आतापर्य$ंत १४ हजारांवर नुकसान सूचना अर्ज शेतकऱ्यांनी दाखल केले आहेत. याव्यतिरिक्त तालुका कृषी अधिकारी कार्यालयातदेखील हजारो अर्ज दाखल झालेले आहेत. या सर्व नुकसान सूचना अर्जांची क्षेत्रीय तपासणी बंधनकारक असल्याचे आदेश कृषी आयुक्तांनी भारतीय कृषी विमा कंपनीच्या व्यवस्थापकांना दिले आहेत.परतीच्या पावसाने दहा दिवसांत जिल्ह्यातील एक हजार ६०६ गावांमधील एक लाख ४७ हजार ९१९ हेक्टरमधील खरीप पिके उद्वस्त झालीत. यामध्ये ९५ हजार ८९९ हेक्टरवरील सोयाबीन, ४१ हजार ६९९ हेक्टरमधील कपाशी, ३ हजार १६३ हेक्टरमध्ये ज्वारी, ३ हजार ४६१ हेक्टरमध्ये धान, ७२० हेक्टरमध्ये तूर, १८३ हेक्टरमध्ये मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये एक लाख ४७ हजार ९८९ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. परतीच्या पावसाने झालेले नुकसान हे प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या तरतुदीत बसत असल्याने शेतकºयांना पीकविमा योजनेचा लाभ मिळू शकतो. याअनुषंगाने जिल्ह्यात १४ हजारांवर नुकसान सूचना अर्ज सादर झाले आहेत.हे सर्व अर्ज विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधींमार्फत एकत्रित करून संबंधित तालुका कृषी आधिकाºयांच्या सहकार्याने सर्व शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तयार करण्याचे निर्देश राज्याचे कृषी आयुक्तांनी विमा कंपनीला दिले आहेत. ही यादी सर्र्वेक्षण यंत्रणेच्या सुपूर्द करावी, सर्व क्षेत्रीय पंचनाम्याकरिता विमा कंपनीचे अधिकारी संबंधित गावांमध्ये उपस्थित राहतील याची खात्री करावी, अन्यथा शासकीय यंत्रणेद्वारा करण्यात आलेले सर्वे ग्राह्य धरावे लागतील, अशी तंबी कृषी आयुक्तांनी दिली आहे.जिल्ह्यात दररोज प्राप्त अर्जांचा अहवाल ठेवण्यात यावा व तो जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सादर करण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत प्राप्त नुकसान अर्जांची क्षेत्रीय तपासणी करणे बंधनकारक असल्याची तंबी कृषी आयुक्तांनी विमा कंपनीच्या व्यवस्थापकांना दिल्याची माहिती आहे.कृषिमंत्र्यांद्वारा बाधित क्षेत्राची पाहणीकृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल बोंडे यांनी रविवारी जिल्ह्यात चांदूर बाजार तालुक्यात गोविंदपूर, मोर्शी तालुक्यात काटसूर व अचलपूर तालुक्यात आसेगाव येथील शिवारात जाऊन बाधित पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार बच्चू कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.जिल्हा बाधित, जिल्हाधिकारी रजेवरदिवाळीपूर्वी १० दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील दीड लाख शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. अशा स्थितीत शासनाच्या माघारी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी जिल्हाधिकारी शैलेश नवाल हे आठ दिवसांपासून रजेवर आहेत. याविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शनिवारी जिल्हा दौºयावर असलेले राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्याबाबत बैठकीत खडेबोल सुनावले.शनिवारपर्यंत ३४ हजार संयुक्त पंचनामेजिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले. बाधित १.४५ लाख हेक्टरमधील पिकांचे पंचनाम्याची प्रक्रिया युद्धस्तर सुरू आहे. शनिवारपर्यंत अमरावती तालुक्यात ७३५०, भातकुली ५०३२, नांदगाव खंडेश्वर १३३५, चांदूर रेल्वे ६७४, धामणगाव १८९५, तिवसा ११४९, मोर्शी ६३५०, वरुड २५५, अचलपूर ८१७, चांदूर बाजार १२७४, दर्यापूर १३९१, अंजनगाव सुर्जी ७४०, धारणी ३३९० व चिखलदरा तालुक्यात २२९४ अशा एकूण ३३ हजार ९४६ शेतकºयांच्या बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले.विमा कंपनीकडे मनुष्यबळाचा अभावजिल्ह्यात दीड लाख हेक्टरमधील खरीप पिके बाधित झाल्यावर नुकसानग्रस्त १६०६ गावांमध्ये कृषी व महसूल विभागाचे संयुक्त पथक युद्धस्तरावर सर्वेक्षण करीत आहेत. या पथकांसोबत विमा कंपनीचा प्रतिनिधी असणे महत्त्वाचे आहे. मात्र, विमा कंपनीकडे मनुष्यबळ तोकडे असल्यामुळे संयुक्त पंचनामे ग्राह्य धरून शेकºयांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश शासनाने विमा कंपनीला दिल्याचे माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

टॅग्स :Anil Bondeअनिल बोंडेBacchu Kaduबच्चू कडू