शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई निधीतून भरणार पाणी योजनांची वीज बिले

By admin | Updated: May 31, 2014 23:10 IST

राज्यातील टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सरकारने नवीन उपाययोजना अस्तित्वात आणली आहे. वीज बिलाचा भरणा केल्यामुळे टँकरच्या खर्चात होणारी बचत व

अमरावती : राज्यातील टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सरकारने नवीन उपाययोजना अस्तित्वात आणली आहे. वीज बिलाचा भरणा केल्यामुळे टँकरच्या खर्चात होणारी बचत व कमीत कमी खर्चाच्या उपाययोजना लक्षात घेऊन अशा पाणीपुरवठा योजना सुरू करण्याच्या दृष्टीने १५ मे ते १५ जून २0१४ या काळातील वीज देयक टंचाई निधीतून देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. टँकरच्या खर्चात बचत होईल, अशाच ठिकाणी वरीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे सांगण्यात आल्याने अधिकार्‍यांना अशा योजना अभ्यास करून शोधाव्या लागणार आहेत. ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत असेल त्या वाड्या-वस्त्यांवर तत्काळ मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना येत्या ३0 जूनपर्यंत दिले आहेत. तसेच पाणी योजना सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करण्यात आला आहे. पाणीपुरवठा करताना टँकरवर पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. टँकरवर खर्च होणारा हाच पैसा पाणी योजनांची थकित बिले देण्यात घालवला तर निदान टंचाईच्या काळात तरी या समस्येची तीव्रता कमी होणार आहे. यासाठी टँकरच्या खर्चात खरच बचत होईल असाच टंचाईचा परिसर अधिकार्‍यांना शोधावा लागणार आहे. याठिकाणी अस्तित्वात असणार्‍या पाणी योजनांची चालू महिन्याची वीज बिले टंचाई निधीतून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. रोहयोंतर्गत घेण्यात आलेल्या सार्वजनिक विहिरींचा केवळ पेयजलासाठीच वापर होत असेल. अशा विहिरींना पाईपलाईन व विद्युत मोटारी बसविण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार आहे. यासाठी होणारा खर्चही पाणीटंचाई निधीतून भागविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  या निर्णयामुळे पाणी टंचाईच्या विजदेयका अभावी बंद पडलेल्या योजनांना दिलासा मिळणार आहे.  (प्रतिनिधी)