वरुड: तालुक्यातील ढगा गावलगतच्या पुलाजवळ वरुडकडे येणाऱ्या कारवर समोरून येणारी दुचाकी धडकली. यामध्ये दुचाकीस्वाराचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना १४ मार्च रोजी दुपारी २.३० दरम्यान घडली. आशिष विनायकराव गुल्हाणे (३७, रा. आमनेर) असे आहे.
एमएच २९ बीपी ०७८० ही कार नरखेडहून कीर्तनकारांना घेऊन वरुडकडे येत होती. एमएच २७ डब्ल्यू ६८३२ या क्रमांकाच्या दुचाकीने आशिष आमनेरकडे जात त्याने कारला जोरदार धडक दिली. यामध्ये कारचा दर्शनी भाग चेंदामेंदा झाला, तर आशिष गंभीर जखमी झाला. नागरिकांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. ठाणेदार प्रदीप चौगावकर यांचे मार्गदर्शनात एपीआय सुनील पाटील यांनी पंचनामा केला.