शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी-कर्मचाऱ्यांना दर बुधवारी सायकल बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 05:00 IST

महापालिका क्षेत्रात ३१ मार्चपर्यंत ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान राबवण्यिात येत आहे. या अभियान कालावधीत नसिर्गातील पंचतत्त्वाला व मानवी जीवनाला सहकार्याच्या दृष्टीने हे आदेश काढण्यात आलेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराचे आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने आयुक्तांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दर बुधवारी सायकलने येणे बंधनकारक केले आहे. वाहनाने आल्यास आवारात प्रवेश दिला जाणार नसल्याचे त्यांनी निक्षून बजावले.महापालिका क्षेत्रात ३१ मार्चपर्यंत ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान राबवण्यिात येत आहे. या अभियान कालावधीत नसिर्गातील पंचतत्त्वाला व मानवी जीवनाला सहकार्याच्या दृष्टीने हे आदेश काढण्यात आलेले आहेत. ही सायकलदेखील यंत्रविरहीत असावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्येकाने आदेशाचे पालन करणे बंधनकारक केले आहे. आरोग्य व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा व अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांसह परिसरातील किमान पाच नागरिकांना याचे महत्त्व पटवून अभियानाची व्याप्ती वाढविण्याविषयी सहकार्य करण्याच्या सूचना या अभियानाचे नोडल अधिकारी तथा सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी स्पष्ट केले.महापालिका क्षेत्रात २ ऑक्टोबर ते ३१ मार्च दरम्यान प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित व निर्सगासी संबंधित ह्य माझी वसुंधराह्ण अभियान राबविण्यात येत आहे. यात पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वावर आधारित शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.पदाधिकारी, नगरसेवकही सायकलने : महापौरकेवळ प्रशासनच नव्हे, तर महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांनीदेखील दर बुधवारी महापालिकेत सायकलनेच येण्याच्या सूचना महापौर चेतन गावंडे यांनी केल्या. लॉकडाऊन काळात प्रदूषणात मोठी घट झाली होती. सायकलने कोरोना संसर्गाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासदेखील मदत होणार असल्याचे महापौर चेतन गावंडे म्हणाले.पर्यावरण रक्षण व आरोग्याचे संवर्धनासाठी सायकलने फिरणे महत्त्वाचे आहे. याचसोबत अमरावतीकरांनी एक दिवस सायकलचा अवलंब केल्यास प्रदूषण घटण्यास मदत होईल.- प्रशांत रोडेआयुक्त, महापालिका