शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली

By admin | Updated: June 29, 2017 00:28 IST

भरधाव दुचाकी उड्डाणपुलावरील कठड्यावर धडकून दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले.

दोघे जखमी : राजापेठ ते इर्विन मार्गावरील घटनालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भरधाव दुचाकी उड्डाणपुलावरील कठड्यावर धडकून दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या राजापेठ ते इर्विन चौक ते राजापेठ उड्डाणपूलावर घडली. नागरिकांनी दोन्ही जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले. गोपालनगरातील रहिवासी जीवन घोरसाट (२६) व त्याचा मित्र हे दोघेही एम.एच.-२७ बी.यू.-०१९२ ने राजापेठकडून इर्विन चौकमार्गे उड्डाणपूलावरून जात होते. भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघेही दुचाकीसह उड्डाणपुलाच्या कठड्यावर जाऊन धडकले. धडक इतकी जबरदस्त होती की लोखंडी कठड्याचे दोन अँगल तुटले. या अपघातात जीवन घोरसाट यांच्या हाताची दोन बोटे सुद्धा तुटली आहेत. अपघातानंतर उड्डाणपुलावर मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. यावेळी त्यामार्गाने जाणारे कार्तीक शास्त्रकार व खांडेकर या दोघांनीही जखमी जीवन घोरसाटला उचलून त्यांच्या चारचाकी वाहनात टाकले आणि तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात नेले तर जीवनच्या मित्राला रूग्णवाहिकेद्वारे तत्काळ रूग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी राजापेठचे पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्यासह पोलिसांचा ताफा पोहोचला. वृत्त लिहेस्तोवर पुढील चौकशी पोलिसांनी आरंभली होती.