शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बीबी खातूनचा ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

१५ नोव्हेंबर रोजी बडनेरा पोलिसांना चांदुरी स्थित संजय टावरी यांच्या प्लॉटमधील पडीक विहिरीत एका महिलेचा शिर नसलेला व विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. महिलेच्या धडावर शिर नसल्यामुळे तिची क्रूरपणे हत्या केल्याचे स्पष्ट झाले. शिर नसलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते.

ठळक मुद्देआरोपीविरुद्ध १७ गंभीर गुन्ह्यांची नोंद : नार्को टेस्ट करण्याचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रागीट व क्रूर स्वभावाच्या जाकीरउद्दीनने पत्नी बीबी खातूनची निर्घृण हत्या केल्याचे पोलिसांनी गोळा केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यावरून निदर्शनास आले आहे. जाकीरउद्दीनविरुद्ध यापूर्वी हत्येचे दोन गुन्हे, विनयभंग, बलात्कार, घरफोडी व चोरी अशा १७ गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. गुन्हेगारीच्या या दांडग्या अनुभवाच्या जोरावर जाकीरउद्दीनने पत्नीची नियोजनबद्ध हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच्या बळावरच जाकीरउद्दीनने अद्यापपर्यंत पत्नीच्या हत्येची कबुली दिलेली नाही.१५ नोव्हेंबर रोजी बडनेरा पोलिसांना चांदुरी स्थित संजय टावरी यांच्या प्लॉटमधील पडीक विहिरीत एका महिलेचा शिर नसलेला व विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. महिलेच्या धडावर शिर नसल्यामुळे तिची क्रूरपणे हत्या केल्याचे स्पष्ट झाले. शिर नसलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. महिला हरविल्याची तक्रार नसल्यामुळे पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला होता.दरम्यान, मृत महिलेच्या मुलीने व बहिणींनी मृतदेहाची ओळख पटविली. ती महिला बडनेरातील बिलाल कॉलनीतील बीबी खातून असल्याचे निष्पन्न झाले. नातेवाइकांनी बीबी खातूनच्या हत्येचा संशय पतीवर व्यक्त केला. त्यातच बीबी खातूनचा पती जाकीरउद्दीनसुद्धा पसार झाला होता. पोलिसांनी जाकीरउद्दीनचा शोध घेऊन त्याला अटक केली. तत्पूर्वी तो ८ नोव्हेंबर रोजी अकोला येथील मेहुणीकडे गेला होता. बीबी खातून ही भोपाळ येथील मुलीकडे गेल्याचे त्याने सांगितले होते. याशिवाय मी तिला मारले नाही, ती जिवंत आहे, असेही तो बोलला होता. यादरम्यान तो बडनेरातच वास्तव्यास असलेल्या दुसऱ्या पत्नीकडे नियमित जाऊ लागला. मद्यधुंद अवस्थेत तिच्यासमोर बडबड करीत बीबी खातूनच्या मुलीच्या लग्नात खर्च केल्याचेही बोलला. याच सुमारास त्याला भोपाळ येथील मुलीने फोन करून अम्मीबद्दल विचारणा केली. त्यावेळी त्याने बीबी खातून बाजारात गेल्याचे मुलीला सांगितले. अम्मी जेव्हाही भोपाळ यायची, तेव्हा निघण्यापूर्वी व प्रवासादरम्यान सतत फोन करीत असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. मात्र, ८ नोव्हेंबर रोजीपासून बीबी खातूनचा मोबाइल स्वीच आॅफ दाखवित होता. या सर्व बाबी लक्षात घेता, जाकीरउद्दीन हा मेहुणी व मुलीसोबत खोटा बोलल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.जाकीरउद्दीनची पहिली पत्नी बीबी खातून व अन्य एक पत्नी या बडनेरात होत्या. याशिवाय त्याचे अनेक महिलांशी संबध होते. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीदेखील पोलीस चौकशीत पुढे आली आहे. जाकीरउद्दीनविरुद्ध पोलिसांनी तांत्रिक पुरावे व परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले असून, जाकीरउद्दीननेच पत्नी बीबी खातूनची हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे.विहिरीत सापडला अर्धवट जळालेला नकाबचांदुरी स्थित संजय टावरी यांच्या प्लॉटमधील विहीर अग्निशमनच्या मदतीने उपसण्यात आली. पाणी बाहेर काढल्यानंतर विहिरीतील एका मातीच्या गोळ्यात काळ्या रंगाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील नकाब आढळून आले. मात्र, विहिरीत बीबी खातूनचे मुंडके किंवा तिचा मोबाईल दिसला नाही. पोलिसांनी यापूर्वी घटनास्थळावरून बीबी खातूनची चप्पल व बांगड्यांचे काही तुकडे जप्त केले आहेत.बिलाल कॉलनीतून एक किलोमीटर अंतरावर विहीरबीबी खातूनची हत्या कुठे व कशी झाली, ही बाब अद्याप अनुत्तरितच आहे. मात्र, घटनेच्या दिवशी बिलाल कॉलनीतील घरी बीबी खातून व जाकीरचा कडाक्याचा वाद झाला असावा, त्यानंतर जाकीरने तिची हत्या केली असावी आणि मृतदेह एक किमी अंतरावर असलेल्या विहिरीत फेकून दिला असावा, तसेच तिचे मुंडके छाटून ते कुठेतरी पुरले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.आरोपी जाकीरउद्दीनविरुद्ध विविध १७ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये तो पोलीस व न्यायालयीन प्रक्रियेतून गेला आहे. अद्याप त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. परिस्थितीजन्य व तांत्रिक पुराव्यावरून त्यानेच हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे.- यशवंत सोळंकेपोलीस उपायुक्त

टॅग्स :Murderखून