शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बुडीत क्षेत्रात महिला भक्तनिवासाचे भूमिपूजन

By admin | Updated: September 15, 2015 00:08 IST

विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या सावंगा विठोबा येथील श्री कृष्णाजी महाराज देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे.

सावंगा विठोबातील प्रकार : पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश लोकमत विशेषप्रभाकर भगोले  चांदूररेल्वेविदर्भाची पंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या सावंगा विठोबा येथील श्री कृष्णाजी महाराज देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. या तीर्थक्षेत्रातील महिला भक्तनिवासाकरिता जि.प.ने ६५ लाखांचा निधी मंजूर केला. त्यातून भक्तनिवासाचे भूमिपूजनही झाले. मात्र, भक्तनिवासासाठी नदीच्या बुडीत क्षेत्रात जागा निवडल्याने याबाबत देवस्थान समितीने पालकमंत्री खासदारांकडे लेखी तक्रार केली होती. पालकमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. गुढीपाडव्याला श्रीक्षेत्र सावंगा येते मोठी यात्रा भरते. येथे लाखोंच्या संख्येने भक्तगण येतात. संपूर्ण राज्यातून येथे भक्तांचा राबता असतो. त्यात महिलांचा सहभागही लक्षणीय असतो. परंतु येणाऱ्या महिला भक्तांसाठी निवासाची सोय नसल्याने त्यांचे हाल होतात. ही बाब लक्षात घेऊन येथे महिला भक्तनिवास बांधण्याकरिता जिल्हा परिषदेने ६५ लाखांचा निधी मंजूर केला. परंतु प्रत्यक्षात जी जागा महिला भक्तनिवासासाठी निवडली गेली ती नदीच्या काठावर आहे. त्यामुळे तेथे पुराचा धोका संभवतोे. यात महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न कोठेही लक्षात घेतलेला नाही. परिणामी, बुडीत क्षेत्रातील जागा रद्द करून ग्रामपंचायतीसमोरील जागेत महिला भक्तनिवासाचे बांधकाम करावे, अशी मागणी देवस्थान व्यवस्थापन समितीने केली पालकमंत्री पोटे, खा. आनंदराव अडसूळ, मुख्य कार्यपालन अधिकारी व कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे. पालकमंत्र्यांनी कार्यकारी अभियंत्याला तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मागणी करणाऱ्यांमध्ये देवस्थानचे अध्यक्ष गोविंदराव राठोड, उपाध्यक्ष हरिदास सोनवाल, सचिव वामनराव रामटेके, संचालक बबनराव चौधरी आदींसह शेकडो भक्तांचा समावेश आहे. निधीचा विनियोग गांभीर्याने करावाशासनाकडून लोकोपयोगी निधी मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींची नेहमीच धडपड असते. परंतु या निधीचा उद्देश, बांधकामाचे ठिकाण व बांधकाम करणाऱ्या एजन्सीचा गांभीर्याने विचार जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केला तरच हे महिला भक्तनिवास लोकोपयोगी ठरेल, अशी परिसरात चर्चा आहे. सावंगा विठोबा येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाखो भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामध्ये महिला भक्तांचा मोठा सहभाग असतो. महिला भक्त बाहेरगावच्या असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महिला भक्तनिवास गावाच्या मध्यभागी असावे.- गोविंद राठोड, श्रीकृष्ण देवस्थान, सावंगा विठोबा