शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' भोंदूबाबाची अंनिससमोर शरणागती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST

स्वप्नात शिवशंकर आल्याचे सांगून २ फेब्रुवारीला झाडाचा देव बनविणाऱ्या बाबाने मंगळवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसमोर सपशेल शरणागती पत्करली. हात जोडून त्याने समितीच्या पदाधिकारी, सदस्यांना माफी मागितली. पुन्हा हा गोरखधंदा करणार नाही, असे त्याने वचनही दिले. यापुढे आढळलास, तर पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा देण्याचे अर्थात समितीही विसरली नाही.

ठळक मुद्देभांडाफोड : अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मागितली माफी

मोहाच्या झाडाला बनविले होते देवलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वप्नात शिवशंकर आल्याचे सांगून २ फेब्रुवारीला झाडाचा देव बनविणाऱ्या बाबाने मंगळवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसमोर सपशेल शरणागती पत्करली. हात जोडून त्याने समितीच्या पदाधिकारी, सदस्यांना माफी मागितली. पुन्हा हा गोरखधंदा करणार नाही, असे त्याने वचनही दिले. यापुढे आढळलास, तर पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा देण्याचे अर्थात समितीही विसरली नाही.स्वप्नात देव आले. मोहाच्या झाडाखाली अस्तित्व असल्याचा दृष्टांत दिला. झाडाजवळ गेल्यावर त्या शक्तीचा भसा झाला, असा बनाव एका व्यक्तीने केला. २५ दिवसांत त्या स्थळावर जत्रा भरायला लागली. हार, फुले, प्रसाद अशी दुकाने थाटली गेली. ‘लोकमत’ने हा अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस आणला. लावून धरला. ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मंगळवारी घटनास्थळी भेट दिली. रवींद्र उईके नावाचा रोजंदारी मजूर ही ‘बाबागिरी’ करीत असल्याचे त्यांना आढळले. मध्यप्रदेशातील मुलताई तालुक्यातील पानझिरी येथे असे स्थान असून, तेथून त्याने ही प्रेरणा घेतली. २ फेब्रुवारीला स्वप्नाचा बनाव केला. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर, पार्वती, नागदेवतेच्या मूर्तींची ओटा बांधून स्थापना केली. अंगात कैलास आणण्याचा दावा केला. कॅन्सर, पक्षाघात, आसध्य रोग, लुळे-पांगळे दुरुस्त करण्याचा दावा केला.अंनिससमोर देवाशी संपर्काचा प्रयत्न फोलअंनिसच्या चमूसमोरही त्याने अशा रुग्णांवर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मला इथले पाणी चालत नाही, चौऱ्यागडच्या महादेवाचे पाणी बोलावून मी पितो, असा त्याचा दावा होता. अंनिसने त्याची उलटतपासणी सुरू केली. कैलाससोबत थेट संवाद साधून लोकांचे आजार बरे करण्याचाही त्याने दावा केला. अंनिसने त्याला आव्हान दिले. देवाशी तुझा संवाद आहे, लोकांचे रोग ओळखता; आमच्या कार्यकर्त्याच्या खिशात एक चलनी नोट आहे, ती किती रुपयांची आहे आणि त्यावरील क्रमांक काय, हे तू ओळखून दाखव, असे ते आव्हान होते. जवळपास ४५ मिनिटे त्याने देवासोबत संवाद साधला.

टॅग्स :fraudधोकेबाजी