शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भय्यासाहेब ठाकूर अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 11:57 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार भय्यासाहेब उपाख्य चंद्रकांत रामचंद्र ठाकूर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी मोझरी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देमुलींसह नातवंडांनी दिला भडाग्नीदेशभरातील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार भय्यासाहेब उपाख्य चंद्रकांत रामचंद्र ठाकूर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी मोझरी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ कन्या व तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर, कनिष्ठ कन्या संयोगिता निंबाळकर तसेच नातू यशवर्धनसह अन्य नातवंडांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी राज्यातूनच नव्हे, तर अन्य राज्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होती. त्यांना चाहणाऱ्या हजारोंच्या जनसागराने यावेळी साश्रू नयनांनी श्रद्धांजली अर्पित केली.भय्यासाहेबांचे बुधवारी रात्री मुंबईच्या सोमय्या हॉस्पिटलमध्ये निधन झाल्यानंतर गुरुवारी रात्री अमरावती येथील गणेडीवाल ले-आऊटमधील घरी त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजता भय्यासाहेबांचे पार्थिव गुरुकुंजातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीजवळ आणले व लगेच मोझरी येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेण्यात आले. तेथे सकाळपासून हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने उपस्थितांनी अंत्यदर्शन घेतले. मोझरी येथील त्यांच्या शेतात (शिंदी पांडी) दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी राज्यासह दिल्ली, कर्नाटक, मध्यप्रदेश येथील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी उपस्थित राहून भैयासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली.

राष्ट्रसंताच्या भजनांद्वारे भावनांना वाट मोकळीभय्यासाहेबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले असता, त्यांच्या चाहत्यांनी राष्ट्रसंताची भजने गाऊन भावनांना वाट मोकळी केली. अंत्यदर्शनाला पालकमंत्री प्रवीण पोटे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खा. आनंदराव अडसूळ, आ. वीरेंद्र जगताप, आ. आशिष शेलार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार केवलराम काळे, साहेबराव तट्टे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, रिपाइंचे नेते राजेंद्र गवई, प्रदेश महिला काँगे्रस अध्यक्ष चारुलता टोकस, जिल्हा काँगे्रस कमिटी अध्यक्ष बबलू देशमुख, एसडीओ विनोद शिरभाते, तहसीलदार राम लंके यांच्यासह सर्वपक्षीय नेते, अधिकारी व हजारो चाहते उपस्थित होते. गुरुवारी रात्रीपासूनच पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर