पालकमंत्र्यांची उपस्थिती : आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शनअमरावती : भारतीय युवा मोर्चाच्या अमरावती शाखेचे कार्य प्रशंसनीय असून आगामी दिवसांत शहरात युवा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात धूम केल्याशिवाय राहाणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी केले. ते शहरातील टाऊन हॉल येथे आयोजित भारतीय जनता युवा मोर्चाच्या मेळाव्यात युवा कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने गोरगरीब व सर्वसामान्य जनतेसाठी अतिशय चांगले धोरणे व योजना आणल्या असून त्याचा प्रचार व प्रसार कार्यकर्त्यांनी योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे आवश्यक असून विविध उपक्रम राबवून जनतेच्या मनात घर करणे या माध्यमातून सोपे होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज निवडणुकीची तयारी आतापासून केल्यास अमरावती महानगरपालिकेपासून जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहाणार नाही, असे पालकमंत्री पोटे म्हणाले. यावेळी भाजयुमोची शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. मंंचावर भाजपाचे प्रदेश महासचिव रामदास आंबटकर, प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, प्रताप अडसड, किरण पातुरकर, चेतन गांवडे, संजय अग्रवाल, विवेक कलोती आदी उपस्थित होते
भारतीय जनता युवा मोर्चाचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 00:10 IST