शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार झाडावर आदळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST

एकाचा मृत्यू, कुटुंबातील तिघे गंभीर, पिंपळखुटा लहान येथील घटना मोर्शी : भरधाव कार झाडावर धडकल्याने एकाच कुटुंबातील चौघे गंभीर ...

एकाचा मृत्यू, कुटुंबातील तिघे गंभीर, पिंपळखुटा लहान येथील घटना

मोर्शी : भरधाव कार झाडावर धडकल्याने एकाच कुटुंबातील चौघे गंभीर जखमी झाले. त्यातील एकाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. अमरावती मार्गावरील पिंपळखुटा लहान फाट्यानजीक शनिवारी दुपारी ही घटना. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अरविंद इंगळे (६०, प्रज्ञा कॉलनी, मोर्शी) असे मृताचे नाव आहे.

जखमींमध्ये मोर्शी शहरातील प्रज्ञा कॉलनी येथील रहिवासी अरविंद इंगळे (६०) मंदा अरविंद इंगळे (५०), तुषार इंगळे (२७) व मोनिका तुषार इंगळे (२५) यांचा समावेश आहे. एमएच २७ बी ५४६३ या कारने हे कुटुंब अमरावतीकडे परत येत होते. पिंपळखुटा लहान फाट्यानजीक चालक तुषार इंगळे यांचे कारवरील नियंत्रण सुटून कारची झाडावर जाऊन आदळली. या धडकेत झाड अक्षरश: हलले. कारमधील चौघे गंभीर जखमी झाले. तर, कारचा दर्शनी भाग चकनाचूर झाला.

अमरावतीहून वरूडकडे जाणारे येथील अजय देशपांडे, नीलेश लोणकर यांनी इतर युवकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे आणले. चारही जखमींचे हात पाय फ्रॅक्चर असून दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चौघांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलिवण्यात आले. मात्र, अमरावती पोहोचण्यापुर्वीच अरविंद इंगळे यांचा वाटेतच मृत्यू झाला. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला कॉल करूनही ती जखमीच्या मदतीला घटनास्थळी पोहोचू शकली नाही. अखेर वरूड येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोशन दारोकर यांच्या वाहनाने रुग्णांना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी गजानन ब्राह्मणे, मधुकर पोहणे, सुशील शेळके, भूपेंद्र कुवारे, गजू अमझरे, सचिन कोहळे यांनी सुद्धा मदत केली.