शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डी येथील स्मशानात भजन, कीर्तन अन् प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:18 IST

स्मशानभूमीत मृतदेह जाळला की स्मशान शांतता. गाववेशीवरील एक भीतीदायक ठिकाण, रात्री, दिवसा तेथून जाण्यासाठी घाबरल्यासारखे होणे, मनात भूत आदी विचार. परंतु, अचलपूर तालुक्यातील बोर्डी नावाच्या छोट्याशा खेड्याने या सर्वांवर मात केली आहे.

ठळक मुद्देबुद्धवंदनेने सुरुवात राष्ट्रवंदनेने समारोपस्मशानात दानपेटी, सुविचार, उद्यान अन् जेवणावळी

नरेंद्र जावरेआॅनलाईन लोकमतपरतवाडा : स्मशानभूमीत मृतदेह जाळला की स्मशान शांतता. गाववेशीवरील एक भीतीदायक ठिकाण, रात्री, दिवसा तेथून जाण्यासाठी घाबरल्यासारखे होणे, मनात भूत आदी विचार. परंतु, अचलपूर तालुक्यातील बोर्डी नावाच्या छोट्याशा खेड्याने या सर्वांवर मात केली आहे. येथे श्री संत कबीर स्मशानभूमीत सुविचार फलक, दानपेटी लावण्यासह भजन, कीर्तन, प्रबोधन आणि बुद्धवंदनेसह राष्टÑसंत तुकडोजी महाराजांची राष्टÑवंदना म्हटली जात असल्याचा प्रकार स्मशानभूमीत बघून सर्व स्तब्ध झाले.अचलपूर तालुक्यातील ‘बोर्डी’ ग्रामपंचायत दीड हजांरावर लोकसंख्येचे इवलेसे खेडे, मात्र, गावातील स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण आणि तेथे एखाद्या देवालयाप्रमाणे होणारे कार्यक्रम अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले.सर्व समाजाची स्मशानभूमी असल्याने ‘एक देश एक स्मशान’ या तत्त्वावर येथील नागरिक आपसात कुठलाच भेदभाव ठेवीत नाही, मात्र, मुस्लीम बांधव वगळता सर्व समाजाच्या मृतदेहांना अग्नी, दफन केले जाते. मुस्लीम बांधवांनीसुद्धा येथे यावे, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रमेश अंबाडकर यांनी सांगितले. १९८७ ला बोर्डी गावात स्मशानभूमी तयार झाली. शासन, नागरिकांसह, लोकप्रतिनिधींनी आर्थिक सहकार्य केले. परंतु स्मशानभूमीबद्दल असलेली मनातील भीती दूर व्हावी, सर्वात शांत ठिकाण म्हणून तेथे सामाजिक कार्यावर संतांचे विचार सांगत, मान्यवरांच्या हस्ते प्रबोधन केले जाते.स्मशानातील फुलांनी देवपूजाबोर्डी गावातील स्मशानात दीडशे विविध प्रजातींची झाडे आहेत. पूर्वी स्मशानातील झाडांची फुले घरात नेणे अपशकुन समजल्या जात होते. आता ती अंधश्रद्धा दूर झाली, नागरिक फुलं नेतात, येथे सुविचार फलकावर वेगवेगळे संतांचे विचार लिहिले जातात. छान उद्यान तयार करण्यात आले आहे. बसण्यासाठी सोळा बेंच, झुला आहे. मंदिराप्रमाणे दोन दानपेट्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस पाहता दानपेटीतील रकमेतून स्मशानाचा विकास व पाणेरी लागणार असल्याचे सांगण्यात आले.सत्कार, वाढदिवस, वंदना अन फराळ...: श्री संत कबीर निर्वाणभूमीवर २४ मार्च रोजी नंदू वºहेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभरात आंतरजातीय विवाह केलेल्या नवदाम्पत्यांचा सत्कार प्रबोधन ठेवण्यात आले आहे. बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरूवात, तर राष्टÑवंदनेने समारोप होणार आहे. मोठ्या संख्येने राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सपत्नीक सत्कार केला जाईल. स्मशानभूमीत जेवणावळी, डबेपार्टी हे नित्याचेच झाले आहे. अंधश्रद्धा दूर व्हावी, स्मशानभूमीबद्दल भीती नष्ट व्हावी, यासाठी सर्व नागरिकांना एकत्र आणून कार्यक्रम घेण्यात येत असल्याने दरवर्षी भक्कम प्रतिसाद लाभत असल्याचे रमेश अंबाडकर म्हणाले. ‘राष्टÑसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत ‘उठो दिसे ते पूर्ण करी। जगाचा तोल संत सावरी। केल्याचा स्पर्श नसे अंतरी।’ म्हणीत जेथे उणे दिसते तिथे कार्य करताना गावकऱ्यांचा सहभाग लाभत असल्याचे अंबाडकर यांनी सांगितले.सर्व समाजबांधवांनी एकाच स्मशानभूमित अंत्यविधीसाठी यावे, यासाठी आपण कार्यरत आहे. समाजसेवा करताना अंधश्रद्धा, भीती नष्ट व्हावी, चांगले विचार समाजात रूजवावे यासाठी हे विनामूल्य कार्य आपण करतो.- रमेश अंबाडकर,सामाजिक कार्यकर्ते, बोर्डी.