शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बी.फार्म. अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:39 IST

नियमित व पुरवणी परीक्षेसाठी अन्य विद्यापीठांच्या तुलनेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून अवाजवी शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे विभागातील औषधनिर्माणशास्त्र (बी. फार्म.) च्या शेकडो विद्यार्थ्यांना प्रहार विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वात शनिवारी विद्यापीठात मोर्चाद्वारे धडक दिली.

ठळक मुद्देशुल्क कमी करा : पोलिसांचा तगडा बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नियमित व पुरवणी परीक्षेसाठी अन्य विद्यापीठांच्या तुलनेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून अवाजवी शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे विभागातील औषधनिर्माणशास्त्र (बी. फार्म.) च्या शेकडो विद्यार्थ्यांना प्रहार विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वात शनिवारी विद्यापीठात मोर्चाद्वारे धडक दिली.नियमित परीक्षेचे शुल्क तब्बल २ हजार २४०, तर पुरवणी परीक्षेचे १ हजार ६४० रुपये आकारण्यात येत आहे. एवढे शुल्क घेऊनही परीक्षेचा निकाल वेळेत लागत नाही. निकालात अनेक त्रुटी आढळून येतात. पुनर्मूल्यांकनाचा निकाल उशिरा लागत असल्याने विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. जानेवारी महिन्यात शुल्क नियामक प्राधिकर समिती गठित करून चौकशी करण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी दिले होते. सदर समितीचे गठण झाले असले तरी याबाबत निर्णय घेण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या संबंधित समित्यांचे गठण झालेले नाही. सप्टेंबरपर्यंत अंतिम निर्णय होऊन पुढील सत्रापासून अंमलबजावणी करण्याची हमी कुलगुरूंनी दिली होती. त्याची आठवण यावेळी करून देण्यात आली. फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे उपप्रदेशाध्यक्ष व प्रहार विद्यार्थी संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष अक्षय राऊत, अमरावती जिल्हाध्यक्ष अमोल वाघमारे, ईश्वर राऊत, शुभम वारणकर, दीपक ढाबे, अतुल वाघमारे आदी उपस्थित होते.