शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

वाहन चोरट्यांनो सावधान; शॉक सिस्टिम आली आहे!

By admin | Updated: July 27, 2014 23:30 IST

कधी तुमचे दुचाकी वाहन चोरी गेली आहे का? मग ती शोधायला किती मेहनत घ्यावी लागली असेल. पण ते जाऊ दे धावपळ केल्यानंतरही वाहन मिळाले नाही तर! आता ही चिंता करण्याची आवश्यकता नाही.

अमरावती : कधी तुमचे दुचाकी वाहन चोरी गेली आहे का? मग ती शोधायला किती मेहनत घ्यावी लागली असेल. पण ते जाऊ दे धावपळ केल्यानंतरही वाहन मिळाले नाही तर! आता ही चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण शहरातील एका हौशी युवकाने चोरावर शिरजोर होत एक असा ट्रॅकर तयार केला आहे, जो तुमच्या वाहनाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल त्याला ४४० तर नाही पण ३०० व्होल्टेजचा झटका मात्र बसणार आहे. नवसारी मार्गावरील हर्षराज कॉलनी परिसरातील एकवीरा विद्युत कॉलोनीत राहणाऱ्या अमित थेर या धडपड्या विद्यार्थ्याला, असे आविष्कार तयार करण्याचा छंद आहे. लहानपणापासूनच त्याने याची जोपासना केली आहे. त्यामुळेच वयाच्या २४ व्या वर्षांत या उंबरठ्यावर त्याने चोरट्यांना धडा शिकविण्याचा मानस बाळगला आहे. अमित हा बीएससी इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी असून पुणे येथे शिक्षण घेत आहे. अमित थेरने ‘लोकमत’शी बोलताना आपल्या आविष्काराची माहिती दिली. तो म्हणाला की, त्याने गाडीच्या चाकाला एक शॉक सिस्टिम लावली आहे. जी थेट बॅटरीशी जुडलेली आहे. या सिस्टिममध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट लावण्यात आले आहे. जे ३०० व्होल्टपर्यंत पॉवर सप्लाय करते. जर कोणी व्यक्ती ही ट्रॅकर सिस्टीम लावलेले वाहन चोरण्यासाठी त्याला हात लावण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला काही सेकंदातच इलेक्ट्रिक शॉक लागेल आणि तो काही क्षणासाठी बेशुध्ददेखील होऊ शकतो. म्हणजे तुमचे वाहनही बचावले आणि चोराला धडा शिकविला म्हणून चांगले नागरिक असण्याचे कर्तव्यदेखील पूर्ण होईल. असा होऊ शकतो उपयोग हे इलेक्ट्रिक सॉकीट फक्त वाहनांसाठीच नाही तर पाण्याच्या टाकीमध्येदेखील उपयोगी पडू शकते. पाण्याच्या टाकीमध्ये हे यंत्र लावल्यानंतर ती पाण्याने पूर्णपणे भरल्यावर यामध्ये आवाज होतो. ज्यामुळे तुम्हाला टाकी ‘फुल्ल’ झाली, हे कळते. शिवाय आपण पाण्याचा अपव्यव पण टाळू शकतो. अशाप्रकारे कुठलेही नकसान रोखण्याच्या उद्देशाने या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करता येणार आहे. तसेच हे यंत्र वापरणे सामान्यांनादेखील शक्य आहे.