शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सावधान, अचलपूर तालुक्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:12 IST

अनिल कडू पान ३ ची लिड परतवाडा : अचलपूर तालुक्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढ ...

अनिल कडू

पान ३ ची लिड

परतवाडा : अचलपूर तालुक्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढ होत आहे. परतवाड्यात म्युकरमायकोसिसच्या अतिगंभीर १५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यात डॉक्टरांना कुणाचा जबडा, कुणाच्या जबड्याचे हाड, कुणाचे दात काढावे लागले आहेत. हिरड्यांनवरही शस्त्रक्रिया करावी लागली आहे. या शस्त्रक्रिया अवघ्या २० ते २५ दिवसातील आहेत.

कोरोनावरील उपचारानंतर बरे झालेल्या व्यक्तींना हा म्युकरमायकोसिसचा त्रास होत असून अशा रुग्णांवर या शस्त्रक्रिया डॉक्टरांना कराव्या लागल्या आहेत. दात दुखणे, दात हालायला लागणे, हिरड्यांनमधून पू बाहेर येणे, दातांचे दुखणे सहन न न होणे, दात, हाड खराब होणे, डोकं दुखणे ही लक्षणे या रुग्णांनमध्ये आढळून आली आहेत.

बुरशीजन्य असलेल्या म्युकरमायकोसिसच्या आजारत या रुग्णांना च्या मुखात दातांवर जबड्यांत काळ्या रंगाची बुरशी स्पष्टपणे बघायला मिळाली आहे. ही काळी बुरशी त्यांच्या दातांकरिता, जबड्यांकरिता,हिरड्यांकरिता घातक ठरली आहे. यात काहींना डोळ्यांचाही त्रास जाणवत आहे.

म्युकरमायकोसिसच्या त्रासाने ग्रस्त एक डोळ्याचा रुग्ण स्थानिक डोळ्यांच्या डॉक्टरकडे पोहचला. पण नंतर तो त्यांच्या कडे आलाच नाही.म्युकरमायकोसिसने त्रस्त दात,नाक,कान, डोळ्याचे रुग्ण अमरावती, नागपूर कडे उपचारार्थ जात असल्याचे सांगितल्या जात आहे.

अचलपूर तालुक्यासह लगतच्या परिसरात म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठया प्रमाणात निघत आहेत. ही रुग्ण संख्या जवळपास ५० वर पोहचली आहे. हे सर्व रुग्ण आधी कोरोना ग्रस्त होते. कोरोनावर मात केल्यानंतर यांना म्युकरमायकोसिसने त्यांना ग्रासले आहे.

आधी कोरोनातून बरे झाल्यानंतर दिड ते दोन महिन्यांनी म्युकरमायकोसिसचे रुग्ण दिसायचे. आता मात्र अवघ्या १३ ते १४ दिवसांतच याची लागण होत आहे. कोरोना काळातच त्या रुग्णाना म्युकरमायकोसिसची लागण होत असल्याचे चित्र आहे.

जबड्यांच्या हाडांमध्ये ही काळी बुरशी अधिक वेगाने पसरत आहे. मधुमेह असणारे आणि ज्याची साखर नियत्रित नाही. साखरेचे प्रमाण वाढले आहे असे आणि कोरोनातून बरे झाल्यानंतर ज्यांना मधुमेहाची लागण झाली आहे,ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशांना या काळ्या बुरशीने ग्रासले आहे.

औषधांचा तुटवडा

या म्युकरमायकोसिसच्या रुग्णाना अँफ्मोटेरिसिन बी हे महागडे इंजेक्शन द्यावे लागते. पण या इंजेक्शनचा तुटवडा आहे. वेळेवर हे औषध उपलब्ध होत नाही.

कोट

कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णानमध्ये म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे दिसून येत आहेत.साखरेचे प्रमाण अधिक आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना याची लागण होत आहे.वेळीच औषधोपचार केल्यास हा आजार बरा होतो. म्युकरमायकोसिसने ग्रस्त अतिगंभीर १५ रुग्णांवर शस्त्रक्रिया कराव्या लागल्यात.

डॉ. महेश अग्रवाल, दंत व मुख शल्य चिकित्सक, परतवाडा

कोट २

म्युकरमायकोसिसने ग्रस्त अतिगंभीर रुग्नांना ऍनेस्थेशिया देऊन शस्त्रक्रिया केल्या गेल्यात. यात एका शस्त्रक्रियेला तब्बल दोन ते चार तास लागतात. कोरोना काळातच याची लागण झाल्याचे दिसू येत आहे. औषधोपचाराने हा आजार बरा होतो. या आजारात अँम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनची गरज भासते.

डॉ मीनल डफडे, भूलतज्ञ,परतवाडा