आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यातील सरपंचांना प्रतीक्षा असलेला ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळा गुरूवार, २२ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट १३ सरपंचांचा सन्मान केला जाईल. या विजेत्यांना राज्यपातळीवरील पुरस्कारासाठी प्रवेश मिळणार आहे. कठोर परीक्षणानंतर प्रत्येक गटात सर्वोत्कृष्ट तीन सरपंचांचे नामांकन दाखल झाले आहेत. त्यातून सर्वोत्कृष्ट सरपंच म्हणून कोण बाजी मारणार, याकडे आता लक्ष लागले आहे. पुरस्काराबाबत क्षणाक्षणाला उत्सुकता वाढतच चालली आहे.पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी आ. वीरेंद्र जगताप, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार भैयासाहेब ठाकूर, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद, विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे तसेच बीकेटी टायर्सचे जुबेर शेख, महिंद्रा ट्रॅक्टर कस्टमर केअर विभागाचे मॅनेजर नीलेश जोशी उपस्थित राहणार आहेत. बदललेले गाव, झपाट्याने होत असलेल्या विकासाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाºयांना ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्ड २०१७’ ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला आहे.
जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट सरपंचांचा आज सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:20 IST
जिल्ह्यातील सरपंचांना प्रतीक्षा असलेला ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळा गुरूवार, २२ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे होणार आहे.
जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट सरपंचांचा आज सन्मान
ठळक मुद्देलोकमत सरपंच अवॉर्ड : सरपंचांची उत्सुकता पोहोचली शिगेला