शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

वाकलेले विद्युत खांब जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST

चांदूर रेल्वे : तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथील एका शेतशिवारातील वाकलेला विद्युत पोल जीवघेणा ठरू शकतो. त्याअनुषंगाने तेथे नव्याने ...

चांदूर रेल्वे : तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथील एका शेतशिवारातील वाकलेला विद्युत पोल जीवघेणा ठरू शकतो. त्याअनुषंगाने तेथे नव्याने विद्युत खांब उभारावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सौरभ इंगळे यांनी महावितरण कंपनीच्या अभियंत्यांकडे केली आहे.

-----------------------------

देवस्थान मार्गाचे काँक्रिटीकरण रखडले

अंजनगाव बारी : कित्येक वर्षांपासून मंजूर असलेल्या रामगीर महाराज देवस्थान मार्गाचे काँक्रिटीकरण अद्यापही झालेले नाही. सात वर्षांपासून हा रस्ता मुख्य मार्गापासून रामगीर महाराज देवस्थानपर्यंत पूर्ण झालेला नाही. या रस्ता बांधकामादरम्यान नाला येत असून त्याठिकाणी पुलही होणार होता. तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने कामाला स्थगिती दिली. मग रस्ता बांधकामाचा निधी गेला तरी कुठे? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

----------------------

हिवरखेड परिसरात रेतीचे अवैध उत्खनन

हिवरखेड : मोर्शी पोलीस ठाण्यांतर्गत हिवरखेड व परिसरात तस्करांनी रेतीच्या अवैध उत्खननाचा व वाहतूकीचा गोरखधंदा चालविला आहे. बेकायदा वाळूसह सट्टा पट्टी, अवैध गावठी दारू भट्टयादेखील फोफावल्या आहेत. प्लास्टिक पन्नीत व मोठ-मोठ्या टयुबमध्ये गावठी दारू मध्यप्रदेश सीमेवरून हिवरखेड तसेच परिसरात आणली जाते.

-------------

विवाहितेचा विनयभंग, पतीला धमकी

अंजनसिंगी : तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका २५ वर्षीय विवाहितेला शारिरिक संबंधांसाठी बळजबरी करून तिचा विनयभंग करण्यात आला. ३१ जानेवारी रोजी ही घटना घडली. वाच्यता केल्यास पीडिताच्या पतीला जिवाने मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी आरोपी सुरेश पंडित (ह.मु. सुलतानपूर, नांदगाव खंडेश्वर) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------------------

धारणमहू येथे महिलेला मारहाण

धारणी : तालुक्यातील धारणमहू येथील एका ४५ वर्षीय महिलेला तिने चिजवस्तू आणण्यासाठी पैसे मागितले म्हणून मारहाण करण्यात आली. ३१ जानेवारी रोजी पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी आरोपी कमलसिंग भुरासिंग धुर्वे (रा. धारणमहू) याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

-----------------

वाहनाच्या धडकेत तरुण गंभीर

दर्यापूर : अमरावती रोडवरील एका मंगल कार्यालयासमोर भरधाव वाहनाच्या धडकेत नीलेश गोकुळ मराठे (२८, रा. देवपूर) हे गंभीर जखमी झाले. आपले एमएच ०१ सीआर ६९०४ हे मालवाहू वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून लघुशंकेसाठी जात असताना पाठीमागून येणाऱ्या एमएच २७ सीपी ७३५३ या वाहनाने त्यांना धडक दिली. दर्यापूर पोलिसांनी त्या वाहनचालकाविरूद्ध गुन्हा नोंदविला.

----------------

विवाहितेला घराबाहेर काढून मारहाण

भातकुली : तालुक्यातील ढंगारखेडा येथील एका २४ वर्षीय विवाहितेला माहेरहून ५० हजार रुपये आणण्याचा तगादा लावत घराबाहेर काढण्यात आले. समजावण्यासाठी आलेल्या तिच्या वडिलांनादेखील हाकलून लावण्यात आले. ४ ऑक्टोबर २०२० रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी खोलापूर पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी नीलेश धुरंधर, नितेश धुरंधर व दोन महिला (सर्व रा. ढंगारखेडा) यांचेविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

कोदोरी येथे गाईला विळा मारला

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील कोदोरी मारूफ येथील नीलेश मोहकर यांच्या गाईला डाव्या बाजूला विळा मारून जखमी केले. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ही घटना घडली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी गावातीलच एका ५० वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

तिवरा येथे महिलेला मारहाण

अंजनसिंगी : धामणगाव रेल्वे तालुक्यातील तिवरा येथील एका ४० वर्षीय महिलेला दगडाने मारहाण करण्यात आली. १ फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी तिवरा येथील एका अल्पवयीन मुलीविरूद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

मांडवा येथून दुचाकी लंपास

चांदूररेल्वे : तालुक्यातील मांडवा येथील राजेश दिघाडे यांच्या घरातून एमएच २७ व्ही ६१५९ या क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. २० जानेवारी रोजी रात्री ही घटना घडली. चांदूररेल्वे पोलिसांनी याप्रकरणी १ फेब्रुवारी रोजी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-----------------

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

चिखलदरा : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. १ फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी आरोपी सागर अनिल तिवारी (२९, गवळीपुरा) याचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

एकतानगरात महिलेला मारहाण

परतवाडा : कांडलीमधील एकतानगर येथे एका २४ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. १० नोव्हेंबर २०२० रोजी ही घटना घडली. परतवाडा पोलिसांनी याप्रकरणी १ फेब्रुवारी रोजी आरोपी अमिरोद्दीन काली, जमिरूद्दीन, कदिरूद्दीन (सर्व रा. एकतानगर) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

परतवाडा : अंजनगाव मार्गावरील गडकी फाट्याजवळ चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दीपक जावरकर यांचा मृत्यू झाला. अनिकेत टेकाडे (भैसदेही) व एक मुलगी जखमी झाली. २८ जानेवारी रोजी हा अपघात घडला. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी एमएच ३० एझेड ५०२० या चारचाकीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------

पुर्ववैमनस्यातून चुलतभावाच्या डोक्यावर दगड हाणला

वरूड : पुर्ववैमनस्यातून चुलतभावाच्या डोक्यावर दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना ३१ जानेवारी रोजी रात्री ९.३० च्या सुमारास टेंभुरखेडा येथे घडली. याप्रकरणी जखमी मदन मांजरीवार (रा. टेंभुरखेडा) यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी आरोपी दुर्गेश लखन मांजरीवार (रा. करजगाव, वरूड) विरूद्ध गुन्हा नोंदविला.

---------

दहसूर येथील विवाहितेचा छळ

मोर्शी : तालुक्यातील दहसूर येथील एका ३१ वर्षीय विवाहितेचा शारिरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी आरोपी अमोल नवंगे व दोन महिला (रा. दहसूर) यांचेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------