नव्याने चार हेक्टर जागा घेणार : धावपट्टीची लांबी वाढविण्याचा निर्णयबडनेरा : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाची गुरुवारी केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अॅथॉरिटी चमूकडून पाहणी करण्यात आली. विमान ‘टेकआॅफ’ आणि ‘लॅडिंग’ करताना भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता विमानतळाच्या पश्चिम भागातील सीमेकडील चार हेक्टर जागा संपादीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.बेलोरा विमानतळाची पाहणी दरम्यान एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाचे आयटीजीएम व्ही.के.मिश्रा, असिटंट जीएम एम.पी. अग्रवाल, वास्तुशिल्पकार मार्क एक्का, वरिष्ठ प्रबंधक एन. के. गुप्ता, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, बेलोरा विमानतळाचे प्रबंधक एम.पी. पाठक आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)बेलोरा विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ शक्यबेलोरा विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ शक्य असल्याचे एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाचे आयटीजीएम व्ही. के. मिश्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे. बेलोरा विमानतळ अतिशय मोक्याच्या ठिकाणी असून राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, रेल्वे आदी बाबी सोयीच्या आहेत. प्रवासी संख्यादेखील येथे मिळेल, असा अंदाज आहे. ‘नाईट लॅडिंग’ विमानासाठी धावपट्टीत वाढ, सीमेवर प्रकाश व्यवस्था, एटीआर आदी सोई सुविधा असल्यास प्रवासी विमानसेवा सुरू करता येईल, असे मिश्रा म्हणाले.
बेलोरा विमानतळाची एअरपोर्ट अॅथॉरिटीकडून पाहणी
By admin | Updated: May 13, 2016 00:11 IST