शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोवंशहत्या बंदीनंतरही बेलोऱ्याचा कातडीबाजार सुरुच

By admin | Updated: July 27, 2016 00:07 IST

राज्य शासनाने गोवंशहत्या बंदी कायदा लागू केला असताना बेलोरा (विमानतळ) येथे भरणारा विदर्भातील सर्वात मोठा गोवंश कातडी बाजार आजही सुरु आहे.

पोलिसांवर प्रश्नचिन्ह : कोट्यवधींची उलाढालअमरावती : राज्य शासनाने गोवंशहत्या बंदी कायदा लागू केला असताना बेलोरा (विमानतळ) येथे भरणारा विदर्भातील सर्वात मोठा गोवंश कातडी बाजार आजही सुरु आहे. येथे गोवंशाचे कातडे आणून विकले जात असून दर रविवारी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचे वास्तव आहे. अकोला महामार्गालगत सुरु असलेला गोवंशाचा हा कातडी बाजार पोलिसांना दिसत नाही काय? , यावर चिंतन करण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर आहे.मागील आठवड्यात चांदूरबाजार नजीकच्या खरवाडी येथे गोवंशाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने तीन निष्पापांचा बळी घेतल्यानंतर समाजमन सुन्न झाले. मध्यप्रदेश तसेच राज्याच्या सीमेवरुन अमरावती जिल्ह्यात अवैधरित्या गोवंशाची वाहतूक, मांसविक्री होत असल्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, गोवंशाचा कातडी बाजार सुरु असून, याकडे कोणाचेही लक्ष नाही. बेलोरा येथील कातडी बाजारात मध्यप्रदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच आंध्रप्रदेशातून गोवंशाचे कातडे विकावयास आणले जाते. बेलोरा (विमानतळ) येथील कातडी बाजारात देशभरातून व्यापारी कातडे खरेदीसाठी दाखल होतात. कोलकाता, हैद्राबाद, बंगळूर, मुंबई, दिल्ली आदी शहरांतून कातडे खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून कातडे व्यवहारात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. बेलोरावासी त्रस्तअमरावती : बेलोरा येथील गोवंश कातडी बाजार हा लोणी (टाकळी) पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यास सर्वस्वी जबाबदार आहे. दर रविवारी या बाजारात शेकडो वाहनांद्वारे गोवंशाचे कातडे आणले जात असताना ग्रामीण पोलिसांनी एकही कारवाई करु नये, ही बाब चिंतनीय मानली जात आहे. बेलोऱ्याचा कातडी बाजार विदर्भात सर्वात मोठा गणला जातो. बेलोरा कातडी बाजार परिसर लागला की वाहन चालक, नागरिकांना नाकाला हात लावूनच पुढे सरकावे लागते. या भागात अतिशय घाणरडा असा दर्प ही बाब नित्याचीच झाली आहे. पोलिसांना पुरविली जाते रसदबेलोर येथे गोवंशाचा कातडी बाजार नियमीत सुरु ठेवण्यासाठी लोणी पोलिसांना मोठी रसद कातडी व्यावसायीकांकडून दिली जात असल्याची माहिती आहे. हा बाजार पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय सुरु राहू शकत नाही, असे बेलोरा येथील काही ग्रामस्थांचे म्हणने आहे. या कातडी बाजारामुळे बेलोरावासियांचे जगणे कठीण झाल्याची कैफियत ‘लोकमत’ कडे मांडण्यात आली आहे. (वार्ताहर)