शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी आश्रमशाळांची घंटा वाजली, विद्यार्थ्यांना मात्र ऑनलाईन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:09 IST

फोटो - २९एएमपीएच०१ फोटो घेणे- चिखलदरा तालुक्यातील टेंब्रुसोंडा येथील शासकीय कन्या आश्रमशाळेत मुख्याध्यापक शिक्षकांची उपस्थिती पालकांच्या लसीकरणाची जबाबदारी शिक्षकांवरच, ...

फोटो - २९एएमपीएच०१

फोटो घेणे- चिखलदरा तालुक्यातील टेंब्रुसोंडा येथील शासकीय कन्या आश्रमशाळेत मुख्याध्यापक शिक्षकांची उपस्थिती

पालकांच्या लसीकरणाची जबाबदारी शिक्षकांवरच, लर्निंग किटचे वाटप

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ शासकीय, अनुदानित आश्रमशाळा मंगळवारपासून प्रारंभ झाल्या आहेत. पहिल्या दिवशी शिक्षक १०० टक्के उपस्थित असले तरी विद्यार्थ्यांविना आश्रमशाळा ओस पडल्याचे चित्र होते. यादरम्यान अमरावती विभागातील सात प्रकल्पातील शिक्षकांचे पहिले लसीकरण आटोपले असून, दुसरा डोस घेण्याचे नियोजन चालविले आहे. आता पालकांच्या लसीकरणाची जबाबदारी शिक्षकांवर येणार आहे. काही आश्रमशाळांमध्ये लर्निंग किटचे करण्यात आले.

गतवर्षी मार्चपासून आश्रमशाळा ‘लॉक’च आहेत. मात्र, शासनाच्या गाईडलाईननुसार २९ जूनपासून आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शिक्षक शाळेत आणि विद्यार्थी घरी असा अनुभव पहिल्यांदाच निवासी आश्रमशाळांमध्ये आला आहे. पहिली ते बारावीपर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणावर आता भर देण्यात आला आहे. त्याकरिता ऑनलाईन शैक्षणिक सुविधांसाठी साहित्य खरेदी करण्यात आले. धारणी, अकोला, पांढरकवडा, किनवट, पुसद, कळमनुरी, औरंगाबाद या सातही एकात्मिक प्रकल्पांशी अधिनस्थ १२१ अनुदानित आश्रमशाळांमधील १६६७ आणि ८२ शासकीय आश्रमशाळांमधील ८५८ शिक्षकांची पहिल्या दिवशी उपस्थिती होती.

-------------------

पालकांचे गैरसमज करावे लागणार दूर

कोरोना महामारीपासून सावधगिरीसाठी आश्रमशाळांमध्ये प्रवेशित आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांचे लसीकरण करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. आश्रमशाळा प्रारंभ होण्यापूर्वी शिक्षकांचे पहिल्या डोसचे लसीकरण आटोपले आहे. आता शिक्षकांना आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाल्यांचे लसीकरणासाठी समुपदेशन करून लसीकरणाबाबतची भीती, गैरसमज दूर करावे लागणार आहे. दत्तक शिक्षकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

-------------------

प्रकल्पनिहाय आश्रमशाळांची विद्यार्थिसंख्या

प्रकल्पाचे नाव शासकीय अनुदानित

धारणी ७४२९ ९१०६

पांढरकवडा १९५२ ८१२९

किनवट ५७३५ ८७६५

कळमनुरी १८८३ २८०६

पुसद १७७५ ४६५४

अकोला २२८० ६५०१

औरंगाबाद २२२० २४०२

----------------

कोट

शासननिर्देशांनुसार आश्रमशाळा मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत. आश्रमशाळा निवासी असल्या तरी विद्यार्थी तूर्त घरीच असतील. ऑनलाईन शिक्षणाद्वारे अध्ययन करण्यात येणार आहे. शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणासाठी अपडेट करण्यात आले आहे.

- विनोद पाटील, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती.