शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

भाजप गटनेत्याची वर्तणूक महिलांचा अवमान करणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 23:12 IST

जिल्हा परिषदेची शनिवारी बोलावलेली सभा ही तहकूब सभा होती. विषयसूचीवर नवीन विषय अशा सभेत घेता येत नाहीत. असे असताना प्रवीण तायडे यांनी या मुद्द्यावर सदस्य अनिता मेश्राम यांच्याशी हुज्जत घातली. महिला सदस्यांचा अनादर करणारी त्यांची ही कृती निंदणीय असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे म्हणाले.

ठळक मुद्देपत्रपरिषद : जिल्हा परिषद अध्यक्षांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेची शनिवारी बोलावलेली सभा ही तहकूब सभा होती. विषयसूचीवर नवीन विषय अशा सभेत घेता येत नाहीत. असे असताना प्रवीण तायडे यांनी या मुद्द्यावर सदस्य अनिता मेश्राम यांच्याशी हुज्जत घातली. महिला सदस्यांचा अनादर करणारी त्यांची ही कृती निंदणीय असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे म्हणाले.जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात पत्रपरिषद झाली. गोंडाणे पुढे म्हणाले, प्रवीण तायडे यांनी सभागृहातील महिला सदस्यांचा आदर राखणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी अपशब्दाचा प्रयोग केला. त्यांचा जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी व काँग्रेस सदस्य तीव्र निषेध करीत आहेत. तायडे यांनी केलेल्या प्रमादाबद्दल पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर सभागृहाकडून कायदेशीर कारवाईचा विचार होईल, असे ते म्हणाले. मेळघाटातील कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून जिल्हा परिषद पदाधिकारी पैसे घेत असल्याचा तायडे जो आरोप केला, त्याचा निषेध मेळघाटातील सदस्य दयाराम काळे, वासंती मंगरोळे सविता काळे, वनिता पाल यांनी निषेध केला. आम्ही दोषींना धडा शिकवूृ, तायडे यांनी पुरावे द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. पत्रपरिषदेला सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर, प्रियंका दगडकर, सुरेश निमकर उपस्थित होते.युवक कॉग्रेसची जिल्हा परिषदेत नारेबाजीआमसभेतील प्रकाराबाबत माहिती मिळताच युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा परिषदेत धडकलेत. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, परीक्षित जगताप, राहुल येवले, यशवंत काळे, समीर जवंजाळ आदींनी भाजपचे प्रवीण तायडे यांचा निषेध नोंदवित नारेबाजी केली.प्रवीण तायडेविरूद्ध अ‍ॅट्रॉसीटीचा गुन्हासत्ताधारी व विरोधी पक्षाचे सदस्य व पदाधिकाऱ्यांनी गाडगेनगर ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंदविली. अनिता मेश्राम यांच्या तक्रारीवरून प्रवीण तायडेंविरूद्ध अ‍ॅक्ट्रॉसीटी तसेच कलम ३५१ नुसार गुन्हा नोंदविला तर तायडे यांच्या तक्रारीवरून मेश्राम यांच्याविरूद्ध कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.