शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेफिकीर अमरावतीकर... तिसऱ्या लाटेची नांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 05:01 IST

कोरोनाचे रुग्ण कमी-जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. अनलॉकचा निर्णय घेताना सरकारने कोरोना नियमांचे काटेकोरोपणे पालन करावे, असे निर्देश जारी केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी हॉटेल, दुकाने, प्रतिष्ठाने, शासकीय- निमशासकीय कार्यालयात कोरोना नियमांचे पालन करून व्यवहार करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. आता तर आठवडी बाजारही सुरू झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारने अनलॉक केल्यानंतर बाजारपेठेत नागरीक बेफिकिरीने वागत आहे. ९० टक्के नागरिकांच्या चेहऱ्यांवर मास्क दिसून येत नाही. गत आठवड्यात जिल्ह्यात सहा रुग्ण डेल्टा प्लसचे आढळून आले असतानाही कोरोनाची जराही भीती नाही, अशा तऱ्हेने नागरिक वागत आहेत. त्यामुळे येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याचे हे संकेत मानले जात आहे.कोरोनाचे रुग्ण कमी-जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. अनलॉकचा निर्णय घेताना सरकारने कोरोना नियमांचे काटेकोरोपणे पालन करावे, असे निर्देश जारी केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी हॉटेल, दुकाने, प्रतिष्ठाने, शासकीय- निमशासकीय कार्यालयात कोरोना नियमांचे पालन करून व्यवहार करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. आता तर आठवडी बाजारही सुरू झाले आहेत. मात्र, शारीरिक अंतराचा फज्जा, मास्कचा वापर नाही, सॅनिटायझरचा विषय कधीचाच संपला आहे. वाहनचालकही चेहऱ्यावर मास्क लावत नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग पुन्हा दारावर तर उभा नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. सात दिवसांत ३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हा संसर्ग दर संथ वाटत आहे. तथापि, शून्य संसर्ग अद्याप अमरावतीकरांनी गाठलेला नाही. मात्र, या आकडेवारीकडे दुर्लक्ष करून बाजारात, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहे. कोरोनाचा भर ओसरताच नागरिकांचे लसीकरणाकडे पुन्हा दुर्लक्ष झाले आहे. शून्य ते १८ वयोगटातील लसीकरणाचेही नियोजन अद्याप पुढे आलेले नाही. 

इतवारा बाजारात नियमांचा फज्जायेथील इतवारा बाजारात रविवारी हातगाडी, भाजीपाले विक्रेते, फळविक्रेते, दुकानदारांच्या चेहऱ्यांवरून मास्क गायब होते. ग्राहकही खरेदी करताना चेहऱ्यावर मास्क लावत नाही, असे चित्र होते. रेटारेटी, गर्दी ही इतवारा बाजारात नित्याचीच बाब आहे. मात्र, आता कोरोना येणार नाही, अशा अविर्भावात दुकानदार, ग्राहक वावरू लागले आहे. त्यामुळे अमरावतीकरांच्या बेफिकिरीने लवकरच कोरोनाची तिसरी लाट येईल, असे चित्र आहे.

दुकाने, आस्थापनांचे संचालक कोरोना विसरलेशहरातील दुकाने, आस्थापना संचालक कोरोना नियमांचे पालन करीत नाही, हे वास्तव आहे. ग्राहकांना ना मास्क, ना सॅनिटायझर, ना शारीरिक अंतर, तरीही दुकानात प्रवेश मिळतो. कोरोना गेला असाच प्रकार सुरू आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाकडूनही कारवाईला ब्रेक लागला आहे. सर्व काही आलबेल असल्याप्रमाणे कारभार सुरू आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या