शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरच बिअरबारचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 23:17 IST

शहरात पोलीस आयुक्तांच्या नाईट राऊन्डमुळे अवैध व्यवसायीकांसह गुन्हेगारांची तारांबळ उडाली आहे. या नाईट राऊन्डदरम्यान पोलीस आयुक्तांना शहरातील काही घडमोडी आश्चर्यचकीत करणाºया आढळून आल्या आहेत.

ठळक मुद्देनंदीनी बारसमोरील प्रकार : सीपींचा राजापेठ, फे्रजरपुरा हद्दीत नाईट राऊन्ड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात पोलीस आयुक्तांच्या नाईट राऊन्डमुळे अवैध व्यवसायीकांसह गुन्हेगारांची तारांबळ उडाली आहे. या नाईट राऊन्डदरम्यान पोलीस आयुक्तांना शहरातील काही घडमोडी आश्चर्यचकीत करणाºया आढळून आल्या आहेत. गॅलेक्सी बारने टाऊन प्लॅनिंगच्या नियमांचे उल्लंघन करीत पार्किंग गिळंकृत केली, तर शुक्रवारी नाईट राऊन्डवेळी फे्रजरपुरा हद्दीतील नंदीनी बारसमोरील रस्ताच गिळंकृत झाल्याचे सीपींच्या निदर्शनास आले. एवढेच नव्हे, तर काही तरुण दुचाकीवर बसून चक्क रस्त्यावरच बिअरबारचा ढोसताना आढळलेत.शहरात सीपींच्या नाईट राऊन्डमुळे त्यांच्या अधिनस्त यंत्रणेची पोलखोल होत आहे. अनेक ठिकाणी अवैध दारू व्यवसाय, अवैध पार्किंग व वाहतूक नियमांचे उल्लंघन होताना आढळून आले आहे.शुक्रवारी रात्री सीपी दत्तात्रय मंडलिक यांनी फे्रजरपुरा व राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही ठिकाणी फेरफटका मारला. दरम्यान प्रशांतनगर बगिच्याजवळील अवैध पार्किंगसंदर्भात तेथील चायनीज व्यावसायिकांना ताकिद दिली. फरशी स्टॉपनजीक एका बिअर शॉपीवर कारवाई केली. कंवरनगरातील एका पानटपरीवर अवैध दारू मिळाली, तर पानटपरीसमोर अस्तव्यस्त स्थितीत पार्किंग दिसून आली. सीपींनी पानटपरीमालकाची कानउघाडणी करून त्याला तंबी दिली. त्याचप्रमाणे एका आॅनलाईन लॉटरीच्या दुकानात दारुचा माल आढळून आला असून त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान नंदिनी नामक बिअर शॉपीसमोरील रस्त्यावर काही तरुण दुचाकीवर बसून मद्यप्राशनाचा आनंद घेताना आढळून आले. त्यांना कोणाचेच भय नसल्याचे दिसून येत होते. भर रस्त्यावरच असे प्रकार होत असल्याचे सीपींना आश्चर्य वाटले. गेल्या सहा दिवसांत सीपींनी शहरात घेतलेल्या आढाव्यामध्ये संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत होणाºया पोलीस गस्तीचा कारभार उघड झाला.फे्रजरपुरा हद्दीतील एका ठिकाणी काही युवक रस्त्यावरच दुचाकी लावून दारू ढोसत होते. बिअर शॉपी मालक रस्त्याचा व्यवसायासाठी वापर करीत असल्याचे दिसून आले. त्या रस्त्याविषयी माहिती मागिवली असून रस्ताच गिळंकृत करणाºयावर कठोर कारवाई केली जाईल.- दत्तात्रय मंडलिक,पोलीस आयुक्त