शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:15 IST

काही अज्ञात अतिक्रमणधारकांनी हमालपुरा झोन कार्यालयात मंगळवारी दुपारी तोडफोड केली.

ठळक मुद्देहमालपुरा कार्यालयात तोडफोड : राजापेठ ठाण्यात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : काही अज्ञात अतिक्रमणधारकांनी हमालपुरा झोन कार्यालयात मंगळवारी दुपारी तोडफोड केली. तेथे उपस्थित कर्मचाºयांनाही मारहाण केल्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम जोरात सुरू आहे. रस्त्यावर लागणाºया हातगाड्या हटविण्यात येत असताना अतिक्रमणधारक हुज्जत घालत असल्याचे प्रकार दररोजच घडतात. मंगळवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दस्तुरनगर परिसरातील अतिक्रमण हटवून तेथील अतिक्रमणधारकांच्या काही हातगाड्या जप्त केल्या होत्या. यावेळी अतिक्रमणधाराकांचा विरोध अधिकाऱ्यांना सहन करावा लागला. मात्र, काही अज्ञात अतिक्रमणधारकांनी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हमालपुऱ्यातील महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागात धडक देऊन अचानक कार्यालयात फेकफाक सूरू करून खुर्च्या-टेबलांची तोडफोड केली. हा गोंधळ बघून निरीक्षक प्रविण इंगोले, शिपाई विलास खोरपडे व वाहन चालक राजेश गवाने यांनी तोडफोड करणाºयांना मज्जाव केला. मात्र, अतिक्रमणधारक त्यांच्याही अंगावर मारहाण करण्यास धावून आले. कार्यालयातील नासधूस केल्यानंतर त्या अज्ञातानाही बाहेरच्या पार्कींगमध्ये उभे असणाऱ्या दुचाकींची तोडफोड केली. या घटनेची तक्रार पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.