शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोयाबीनला हमीपेक्षा प्रथमच अधिक भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे एटीत असलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. सोयाबीन सवंगणीच्या वेळेतच उद्भवलेल्या त्या परिस्थितीमुळे सोयाबीन काढणे शेतकऱ्यांना फारच कसरतीचे ठरले. काहींना मजुरांअभावी पावसात सोयाबीन झाडावरच ओला होऊ द्यावा लागला, तर काहींनी संवंगणी करून सोयाबीनची गंजी लावली.

ठळक मुद्देदर चार हजार पार : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डीओसीची वाढती मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढती मागणी असल्याचा परिणामी स्थानिक बाजार समितीतही दिसून येत आहे. यंदाचे हमीभाव ३ हजार ७१० रुपये असताना आवक कमी व पावसामुळे मालाचा दर्जा घसरल्याने राणी प्रतीच्या सोयाबीनला बुधवारी ४२०० रुपये दर मिळाला.ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे एटीत असलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. सोयाबीन सवंगणीच्या वेळेतच उद्भवलेल्या त्या परिस्थितीमुळे सोयाबीन काढणे शेतकऱ्यांना फारच कसरतीचे ठरले. काहींना मजुरांअभावी पावसात सोयाबीन झाडावरच ओला होऊ द्यावा लागला, तर काहींनी संवंगणी करून सोयाबीनची गंजी लावली. मात्र, पाऊस उसंतच घेईनात! गंजीतील सोयाबीन उन्हाअभावी कुजण्याच्या स्थितीत पोहोचला होता. काहींनी पावसाच्या मोसमातच सोयाबीन काढला. त्यामुळे ओला असताना काढलेला सोयाबीन तडण मिळू न शकल्याने खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिणामी शेतकऱ्यांना तो तशाच अवस्थेत विकावा लागला. जिल्ह्यात प्रत खराब झालेल्या सोयाबीनचे उत्पादन अधिक प्रमाणात असल्याने काहींनी आधीच विकला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे शासनाने जाहीर केलेला हमीभाव ३ हजार ७१० असताना आवकच्या तुलनेत सोयाबीनला सध्या ३९८१ ते ४२०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.ढगाळ वातावरणाचा आवकवर परिणामयंदा भर पावसामुळे सोयाबीनचा दर्जा खालावला. उत्पादनही घटल्यामुळे भाव बºयापैकी मिळत आहे. बाजार समितीत मंगळवारी ६३९२ पोत्यांची आवक झाली. राणी स्वरुपाच्या सोयाबीनला ४२००, मध्यम दर्जाचा ४००० व हलका सोयाबीन ३९८१ असा दर बुधवारी मिळाला. त्यामुळे बाजार समितीत जिल्ह्यासह बाहेरील शेतमाल विक्रीकरिता येत असतानासुद्धा गतवर्षीच्या तुलनेत ही आवक कमी असल्याचे अडते संचालक प्रमोद इंगळे यांनी सांगितले.१७२ शेतकऱ्यांचा शेतमाल तारणसध्या भाव जरी चांगला असला तरी यंदा सोयाबीनची आवक घटल्याने भविष्यात वाढीव दराचा लाभ मिळण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील १७२ शेतकऱ्यांनी चांगला सोयाबीनचा ७ हजार ९९० क्विंटल माल विक्रीऐवजी तारण ठेवला आहे. त्यावर एक कोटी ६८ लाख ८१ हजार ९०० रुपये कर्ज संबंधित शेतकºयांनी उचलल्याची माहिती शेतमाल तारण विभागप्रमुख पवन देशमुख यांनी दिली.डीओसीच्या उत्पादकेवरून ठरतेय सोयाबीनचे दरआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनचे दर डीओसीच्या उत्पादकतेवरून ठरतात. जसे की ३० टक्के तेल काढल्यानंतर त्या सोयाबीनच्या पेंडापासून जे - जे पदार्थ तयार करण्याची क्षमता असते, त्यावरून सोयाबीनचे दर ठरतात. डीओसीद्वारा सोयाबीनचे दर वाढले असून, पुढे आणखी वाढणार आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्यास घाई करू नये, असा सल्ला संचालक विकास इंगोले यांनी दिला आहे.

टॅग्स :Marketबाजार