सीबीएसई शाळांकडून अपेक्षा : मार्गदर्शक तत्त्वे जाहीरअमरावती : शालेय विद्यार्थ्यांची वाहतुकीकडे अत्यंत गांभीर्याने बघणे आवश्यक असले तरी काही शाळा याबाबत तितक्या जागरुक नाहीत. शाळांना याबाबत संवेदनशील बनविण्याची वेळ आली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य दिले पाहिजे, अशा सूचना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भात सीबीएसईने नव्याने विस्तृत सूचना जाहीर केल्या आहेत.विद्यार्थ्यांची वाहतूक कशाप्रकारे करावी याबाबत शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत. असे असतानाही काही शाळांकडून त्यांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी सीबीएसईकडे आल्या आहेत. त्यांची दखल घेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भात सूचना दिल्या आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना अत्यंत विश्वासाने शाळांकडे सोपविले असते. त्या शाळांनी इमानाला जागायला हवे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यायला हवे. स्कूल बसचे बाह्य आणि आंतरिक स्वरुप बसमधील कर्मचारी, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने केलेल्या तरतुदी दिलेल्या सुविधा वाहतूक करण्यासाठी आवश्यक असणारे परवाने तसेच शाळांनी घ्यावयाची इतर काळजी अशा विविध बाबींचा सीबीएसईकडून मिळालेल्या सूचनांमध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांकडून माहिती घ्यावीज्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस व्यवस्था राबविली जाते, त्या विद्यार्थ्यांना त्याचा योग्य लाभ देण्यात येत आहे किंवा नाही याबाबतही शाळेने सातत्याने माहिती घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांशी बोलून त्यांना स्कूल बसच्या प्रवासात काही अडचणी आहेत किंवा नाही हे शाळांनी समजून घ्यावे, असेही सीबीएसईने म्हटले आहे. स्कूल बसमध्ये मोबाईल फोन असावे, चार चाकी गाड्यांना पुे जाऊ नये, स्कूलबसच्या वाहन चालकाने कामाव्यतिरिक्त विद्यार्थी किंवा कर्मचाऱ्यांशी बोलू नये, अशा विविध सूचनाही लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन आता सीबीएसई पॅटर्न शिकविणाऱ्या शाळा किती गांभीर्याने करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शाळांसोबतच पालकांनीदेखील सुरक्षिततेबाबत जागरुकता ठेवल्यास याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. (प्रतिनिधी)पालकांनी घालावे लक्षविद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी शाळांकडे देतानाच सीबीएसईने पालकांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. मुलांची वाहतूक सुरळीत पद्धतीने होत आहे. वाहन चालक आणि कर्मचाऱ्यांकडून काही नियमभंग होत असल्यास शाळांना त्याबाबत माहीती द्यावी, पालक-शिक्षक सभांमध्ये स्कूल बसबाबत चर्चा करावी आणि वाहतूक व्यवस्थेवर सातत्याने लक्ष द्यावे, असेही सीबीएसईने म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल व्हा संवेदनशील
By admin | Updated: March 6, 2017 00:11 IST