शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

शेतकऱ्यांप्रती तळमळ ठेवा

By admin | Updated: June 22, 2015 00:12 IST

शेतकरी जगला तर आपण जगू. त्यामुळे खरीप पीक हंगामात कर्ज वाटप करताना कागदी घोडे नाचवू नका.

पीककर्ज आढावा बैठक : पालकमंत्र्यांचा बँक अधिकाऱ्यांना सल्लाअमरावती : शेतकरी जगला तर आपण जगू. त्यामुळे खरीप पीक हंगामात कर्ज वाटप करताना कागदी घोडे नाचवू नका. पीककर्ज पुनर्गठनासाठी शेतकरी बँकेत आला की, त्यांना त्वरेने कर्ज मंजूर करा, त्यांच्याप्रती तळमळ ठेवा, असा सल्ला पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी येथे बँकेच्या अधिकाऱ्यांना दिला.येथील बचत भवनात रविवारी पीककर्ज पुनर्गठन व नवीन पीककर्ज वाटपासंदर्भात बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आयोजित कार्यशाळेत ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी खा. आनंदराव अडसूळ, आ. वीरेंद्र जगताप, आ. बच्चू कडू, आ. रमेश बुंदिले, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी अनिल भंडारी, पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, कृषी सहसंचालक सु. रा. सरदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, स्टेट बँकेचे सिंग, बँक आॅफ महाराष्ट्राचे सोनुले, सेंट्रल बँकेचे संजय देवसर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. पोटे यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना कोणत्याही बँकेच्या प्रबंधकांना अडचणीत येऊ देणार नाही. वेळप्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. मागील आठ दिवसांत ७८१ कोटींचे कर्ज वाटप केले. पुढील १० दिवसांत पुन्हा ८०० कोटींचे कर्ज वाटप करायचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मनापासून काम केल्यास नक्कीच पुण्य लाभेल, असे पोटे म्हणाले. जिल्ह्यात २ लाख २१ हजार ९४८ खातेदारांना १६९५ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ४६ टक्के कर्ज वाटप करण्यात आले आहे. प्रसंगी शासन व प्रशासन बँक अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, असे ना. पोटे यांनी स्पष्ट केले. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांनी ताठ मानेने जगावे, यासाठी विविध योजनांची मुहूर्तमेढ रोवत आहे. परंतु सावकारापासून त्यांची फसवणूक होता कामा नये, यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मदतीला तलाठी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी सतत राहतील. मात्र, ३० जूनपर्यंत २०९ बँकांच्या शाखांनी ८०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करुन शेतकऱ्यांसाठी चांगले काम करण्याचे आवाहन ना. पोटे यांनी केले. यावेळी आ. जगताप, आ. कडू, आ. बुदिंले यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच पीककर्ज वाटप करण्याची मागणी केली. बँकेच्या एका शाखेला १० कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य३० जूनपर्यंत १६९५ कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २३ बँकांच्या २०९ शाखांमधून हे काम युद्धस्तरावर करावयाचे आहे. पुढील आठ दिवसांत ८०० कोटी रुपये कर्ज वाटप करायचे असल्याने एका शाखेला किमान १० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करावे लागेल, असे जिल्हाधिकारी किरण गित्ते म्हणाले. तलाठी बँकेतच लॅपटॉप घेऊन बसणार आहे. सातबारा जागेवरच मिळेल. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी प्रशासन घेत असल्याचे गित्ते यांनी स्पष्ट केले.