शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणा!

By admin | Updated: April 15, 2017 00:05 IST

समाजातील विषमता दूर होऊन सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक चळवळ उभारली.

कुलगुरुंचे प्रतिपादन : डॉ.आंबेडकर अभ्यास केंद्रात जयंती साजरी अमरावती : समाजातील विषमता दूर होऊन सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक चळवळ उभारली. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाधिष्ठित समाज निर्माण व्हावा, यासाठी दिलेले विचार प्रत्यक्षात कृतीतून व्यवहारात आणा, असे प्रतिपादन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी केले.डॉ.आंबेडकर अभ्यास केंद्रात बाबासाहेबांची जयंती ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित व्याख्यानात अध्यक्षीय विवेचन करताना कुलगुरू बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र मुंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक तथा प्रभारी कुलसचिव जे.डी.वडते, वित्त व लेखा अधिकारी शशीकांत आस्वले, माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके व केंद्राचे समन्वयक सचिन गायकवाड उपस्थित होते. बाबासाहेबांचा जन्मदिवस ऐतिहासिक असा दिवस असून त्यांनी अखंडीतपणे उपेक्षित आणि शोषित समाजाच्या उत्थानाकरिता कार्य केले आहे. बाबासाहेबांच्या जीवन कार्याची विभागणी बालपण, शिक्षण आणि उच्च विद्याविभूषित अशा तीन विभागात करून त्यांच्या कार्यावर कुलगुरूंनी प्रकाश टाकला. बाबासाहेबांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. अनेक सत्याग्रह व चळवळी त्यांनी उभारल्या, पण हे करीत असताना त्यांनी संयम ठेवला, कधीही ते सुडबुद्धीने वागले नाहीत. आज बाबासाहेब महापुरुषांच्या श्रुंखलेत आहेत. त्यांचे विचार, कार्य आणि संपूर्ण जीवन पुढे नेण्याचा संकल्प आपण सर्वांनी करुया अशी अपेक्षा कुलगुरुंनी व्यक्त करुन बाबासाहेबांच्या जयंतीदिनी मानवंदना दिली.सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पापर्ण कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक भाषण सचिन गायकवाड यांनी तर आभार व संचालन दीपक चोरपगार यांनी केले. कार्यक्रमाला विद्यापीठाचे विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)