शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! यंदा राहणार कडाक्याचा उन्हाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 22:20 IST

सावधान! यंदाचा उन्हाळा भीषण आग ओकणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. दिवसाचे तापमान अधिक तीव्र व नुकसानदायी राहण्याची शक्यता वर्तविली आहे.

ठळक मुद्दे७ ते ९ मार्च वादळी पाऊस, गारपिटीची शक्यता : शनिवारी पारा ३९ अंशावर

आॅनलाईन लोकमतअमरावती : सावधान! यंदाचा उन्हाळा भीषण आग ओकणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. दिवसाचे तापमान अधिक तीव्र व नुकसानदायी राहण्याची शक्यता वर्तविली आहे. विशेष म्हणजे, विदर्भात पुन्हा वादळी पाऊसासह गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली असून, ७, ८ व ९ मार्च दरम्यान हे संकट येणार असल्याचे भाकीत हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी केले आहे.जम्मू-कश्मीर व पाकिस्तानवर चक्राकार वाºयांच्या स्वरूपातील पश्चिमी विक्षोभाची स्थिती असल्याने वादळी पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा १ ते २ अंशाने तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. अनिल बंड यांच्या अंदाजानुसार, विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंश सेल्सियसने अधिक होते. किमान तापमान बहुतेक ठिकाणी दीड ते तीन अंशाने जास्त होते. ४ मार्चपर्यंत तापमानात विशेष फरक पडणार नसून, ५ मार्चपर्यंत हवामान कोरडे व आकाश किंचित ढगाळ राहण्याची शक्यता आहे. ६ ते ८ मार्च दरम्यान मध्य भारतात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.तापमान ४५ अंश सेल्सियसवर जाणार; हवामान तज्ज्ञांची माहितीयंदा उन्हाळ्यात बहुतेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. मध्य भारतात कमाल तापमान सरासरीपेक्षा एका अंशाने वाढण्याची शक्यता आहे. या वाढत्या तापमानाची विदर्भात भीषणता अधिक जाणवणार आहे. देशभरातील ज्या-ज्या ठिकाणी उष्णतेच्या लाट राहील, तेथे उष्णतेचा उग्र परिणाम जाणवणार असल्याचे संकेत हवामानतज्ज्ञ बंड यांनी दिले आहे. सरासरी तापमान एका अंशाने वाढणार असले तरी तुरळक ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन ते चार अंशाने वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेचा प्रभाव जिवाची लाहीलाही करणारा ठरणार आहे. दिवसाचे तापमान ४५ अंश सेल्सियसच्या वर जाण्याचे संकेत आहेत.