पान ४ साठी
मोबाईलवरील ओटीपी शेअर करणे पडते महागात
अमरावती : ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अमुक-अमुक लिंक पाठविली आहे, त्यावर क्लिक करा, तुमच्या खात्यात पैसे जाम होतील, अशी आमिषे दाखवून खात्यातील रक्कम लंपास करण्यात येत आहे. त्याचबरोबर ‘सीम व्हेरिफेकेशन पेंडिंग’ हा मेसेज पाठवून गंडविण्याचा नवाच फंडा आता सायबर गुन्हेगारांनी शोधून काढला आहे.
तुमच्या सीमचे व्हेरिफिकेशन न झाल्यास मोबाईल क्रमांक बंद पडेल, अशी भीती मेसेज पाठवून घातली जाते. प्रत्यक्षात मोबाईल कंपन्यांकडून तशा प्रकारचे मेसेज किंवा फोन कधीही केले जात नाहीत. त्यामुळे नागरीकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहिले पाहिजे, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविले. अनेक जण बक्षीस लागल्याच्या आनंदात मोबाईलवर पाठवलेली लिंक ओपन करतात. त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीला मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर करतात. त्यामुळे चोरट्यांच्या हाती आयतेच कोलीत मिळते. यातून अनेकांना गंडविण्यात येत आहे. त्यातही वयोवृद्ध मंडळींचा अधिक समावेश आहे. बँकेतून फोन केल्याचे सांगूनही खात्यातील रक्कम पळविण्यात येत आहे.
-------------
ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी सावधान
मोबाईलवरून कोणताही ॲप डाऊनलोड करताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ते ॲप बनावट तर नाही ना, याची तपासणी करावी.
-----
फेसबूकवरून बनावट अकाऊंट तयार करून जवळच्या मित्रांना होत आहे पैशाची मागणी.
------------------
असा कॉल वा मेसेज आल्यास सावधान
१) मोबाईल कंपन्यांकडून सिम व्हेरिफिकेशनसाठी कधीच कॉल किंवा मेसेज केला जात नाही तसेच कागदपत्रांचीही मागणी होत नाही. त्यामुळे अशाप्रकारे एखादा काॅल किंवा मेसेज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करणेच गरजचे आहे.
२) काही दिवसांत फेसबूकवर बनावट अकाऊंट तयार करून जवळच्या मित्रांना रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी करण्यात येत आहे.
३) अमरावतीत गेल्या काही महिन्यातच अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यात मित्र अडचणीत असल्याने अनेकांनी दिलेल्या खात्यावर रक्कमही पाठविल्याचे पुढे आले आहे.
----------------------
अशी घ्या काळजी
सिम व्हेरिफिकेशनसाठी मोबाईलवर मेसेज आल्यास त्यात दिलेली कोणतीही लिंक ओपन करून नये तसेच ओटीपी कुणालाही पाठवू नये. मोबाईलवर पुढील व्यक्तीस बोलत असताना काळजी घ्यावी.
------------
मोबाईलवरुन फसविल्याच्या तक्रारी
२०१९-
२०२०-
२०२१-
---------
कोट सध्या ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली आहे. बनावट फेसबूक अकाऊंट तयार करून पैशांची मागणी करण्यात येत असल्याची प्रकरणेही पुढे येत आहेत. अशा चोरट्यांवर सायबर सेलच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. अनेक गुन्हेही उघडकीस आणण्यात आले आहेत.
- सीमा दाताळकर, पोलीस निरीक्षक, सायबर क्राईन सेल