शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! सिझनेबल गुन्हेगार सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 21:26 IST

दरवर्षी सणासुदीच्या दिवसांमध्ये चेनस्नॅचिंग, डिक्कीतील रोकड चोरणे, बँकेतून पैसे काढताच बॅग चोरून नेण्याच्या घटना घडतात. यंदाही ती शक्यता नाकारता येत नसून या सण-उत्सवाच्या दिवसांमध्ये काही परप्रांतीय गुन्हेगार सक्रीय ......

ठळक मुद्देपरप्रांतियांचा समावेश : बाजारपेठेत फिरताना दागदागिने व पैसे सांभाळा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दरवर्षी सणासुदीच्या दिवसांमध्ये चेनस्नॅचिंग, डिक्कीतील रोकड चोरणे, बँकेतून पैसे काढताच बॅग चोरून नेण्याच्या घटना घडतात. यंदाही ती शक्यता नाकारता येत नसून या सण-उत्सवाच्या दिवसांमध्ये काही परप्रांतीय गुन्हेगार सक्रीय असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यादृष्टीने पोलीस यंत्रणा सतर्क असली तरी नागरिकांनी या ‘सिझनेबल’ गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.दरवर्षीच दुर्गा उत्सवाच्या पर्वावर चेनस्नॅचिंगच्या घटना घडतात. घाण अंगावर टाकून नागरिकांकडून रोकड लंपास करण्याच्या घटना दरवर्षी घडत असल्याचे आढळून आले आहे. या घटनांमागे काही परप्रांतीयांचा हात असल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. तामीळनाडू, छत्तीसगढ, मध्यप्रदेश व कर्नाटक अशा विविध राज्यातून चोरांच्या टोळ्या विदर्भात येतात. अशा गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हान दरवर्षीच पोलिसांसमोर असते.सद्यस्थितीत दुर्गा उत्सव संपत आला असून दिवाळी सणाची तयारी सुरु झाली आहे.दिवाळीनिमित्त बहुतांश नागरिक बँकेतून रोख काढून बाजारपेठेत खरेदीसाठी जातात. अशांवर हे ‘सिझनेबल गुन्हेगार’पाळत ठेऊन असतात. या गुन्हेगारांना अटकाव करण्यासाठी नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. बँकेतील पैसे काढताना सोबत एखादा तरी सहकारी ठेवा, अज्ञात व्यक्ती दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे का किंवा पाठलाग करीत आहे का, याकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. बॅकेतून रोख काढल्यावर दुचाकीच्या डिक्कीत किंवा वाहनात ठेवणे धोक्याचे ठरू शकते. बॅकेसमोर ठेवलेली दुचाकी किंवा चारचाकी पंक्चर झाली असेल, तरी स्वत:कडील रोख सांभाळून ठेवा, गुन्हेगार त्यांच्या डाव साधण्यासाठी वाहनाची हवा सोडू शकतात किंवा तुमच्या अंगावर घाण टाकून पैसे लंपास करू शकतात. त्यामुळे शहरात पोलीस यंत्रणा सज्ज असली तरी नागरिकांनीही सजगता बाळगणे अगत्याचे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.उत्सवाच्या दिवसांत गुन्हेगार सक्रीय होतात. पोलीस यंत्रणा सज्ज असली तरी नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नागरिकांनी संशयितांची माहिती पोलिसांना द्यावी.- दत्तात्रय मंडलिक,पोलीस आयुक्त.