लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : कच्च्या फळांना लवकर पिकविण्याच्या प्रयत्नात मानवाला ‘स्लो पॉयझन’ देण्याचा प्रकार उन्हाळयात सुरू आहे. कच्चे आंबे अल्पावधीत पिकवून भरपूर पैसा कमविण्याच्या नादात नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. आंबे पिकविण्याकरिता चीनच्या इथेलीन रायपनर आणि कॅल्शियम कार्बाईडचा सर्रास वापर होेत आहे. यामुळे गोरगरिबांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले असताना अन्न व औषधी प्रशासन विभाग मात्र मूग गिळून बसला आहे.आरोग्यास घातक अशी अति विषारी पॉवडर अलगदच मानवी शयरीरात प्रवेश करून मानवी आजाराला आमंत्रण देण्याचा प्रकार असून, मानवी जिविताशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. परंतु याबाबत कुणीही ‘ब्र ’काढण्यास तयार नसून चवीने हे विषारी आंबे चाखले जातात. या विषारी आंब्याच्या विक्रीतून व्यापारी मालामाल, तर ग्राहक कंगाल होण्याचा प्रकार सुरू आहे. याकडे ेप्रशासनाचे दुर्लक्ष असून, कॅल्शियम कार्बाईडवर सरकारने बंदी घातली असताना हे विषारी पावडर येते तरी कोठून हा प्रश्न आहे. द्राक्षे, केळी, पपई आदी फळांना पिवळा रंग येण्याकरिता या रसायनाचा वापर करुन अवघ्या पाच ते सहा तासातच पिवळे होतात आणि ग्राहकांना याकड ेआकर्षिल ेजावून सर्रास विष मानवांच्या पोटात टाकण्याचा प्रकार सुरु आहे.इथेनॉल रायपनर चीनचे पावडरइथेनाल रायपनर पासून पिकविलेल्या फळांना सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती कमी होवून दुर्धर आजाराला आमंत्रण दिल्या जावू शकते. गडद पिवळया रंगाचे आंबे किंवा फळाचे सेवन कुणीही करु नये, असा सल्ला तज्ञाकडून देण्यात येतो. पंरतू कृत्रिमरित्या पिकविलेले विषारी आंबे बाजारात सर्रास विकल्या जात असल्याने विषयुक्त आंबे, केळीवर तातडीने कारवाई ची मागणी नागरिकांतून होत आहे.आंबे हे इथेनाल रायपनरपासून पिकविलेले असते. अशी फळे खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होवून दुर्धर आजार बळावू शकते. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया केलेली फळे खाऊ नये.- प्रमोद पोतदार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, वरूड
सावधान! पोटात आंब्यातून जातेय विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:00 IST
कच्च्या फळांना लवकर पिकविण्याच्या प्रयत्नात मानवाला ‘स्लो पॉयझन’ देण्याचा प्रकार उन्हाळयात सुरू आहे. कच्चे आंबे अल्पावधीत पिकवून भरपूर पैसा कमविण्याच्या नादात नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
सावधान! पोटात आंब्यातून जातेय विष
ठळक मुद्देविषारी पॉवडरचा शरीरात प्रवेश : इथेनॉल रायपनर, कॅल्शियम कार्बाईडने पिकवितात आंबे