शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! जिल्हा क्र ीडा संकुलाचे ट्रॅक धोकादायक

By admin | Updated: September 21, 2016 00:18 IST

सावधान! येथील जिल्हा क्रीडा संकुलातील रनिंग ट्रॅक अतिशय धोकादायक झाला आहे.

क्रीडा विभागाचे दुर्लक्ष : 'मॉर्निंग वॉक'दरम्यान विद्यार्थी जखमीसंदीप मानकर अमरावतीसावधान! येथील जिल्हा क्रीडा संकुलातील रनिंग ट्रॅक अतिशय धोकादायक झाला आहे. मॉर्निंग वॉक व इव्हिनिंग वॉकला जाणाऱ्यांनासुध्दा ही धोक्याची घंटा आहे. यामुळे क्रीडाप्रमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहेत. अनेक क्रीडाप्रेमी या ट्रॅकवर किरकोळ जखमीसुध्दा होत आहेत. येथील रनिंग ट्रॅकवर २६ जानेवारीच्या शासकीय कार्यक्रमासाठी एक ठेकेदाराला या मैदानावर माती टाकून मैदानाची लेवल लावण्याचा कंत्राट क्रीडा समितीने दिला होता. परंतु या ठिकाणी लाल माती टाकण्यात आली. त्यात रेतीचे कण असल्यामुळे हा रनिंग ट्रॅकपूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे ट्रॅकचा वरील थर खराब झाल्याने तो रनिंगसाठी योग्य नसल्याचा आरोप क्रीडा परिषदेचे पदधिकारी राजेंद्र पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना केला आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते हे जिल्हा क्रीडा समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अधिकारात मैदानाचे मेंटन्स करण्याचा त्यांना अधिकार आहेत. क्रिडाप्रमेंची भावना लक्षात घेता योग्य पदध्दतीने नियमाने हा रनिंग ट्रॅक तयार करावा अशी मागणी करण्यात आली आहे. रनिंग ट्रॅक तयार करताना योग्य प्रकारे ट्रॅक तयार करणे गरजेचे आहे. येथे टेकनिकल पध्दतीने विटांचा चुरा टाकूण, मुरुम टाकूण, या मातीत पाणी शोसून घेण्याची क्षमता या ट्रॅकमध्ये असली पाहिजे.असे ट्रॅक तयार करण्यात यावा अशी भावना क्रिडा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी रनिंग ट्रॅकवर बारीक रेतीचे कण निर्माण झाले असल्यामुळे रनिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांचे किरकोळ होत आहे. येथे मोठा अपघातही होऊ शकते, याला जबाबदार कोण, असा प्रश्न पडत आहे. येथे शेकडो लहान विद्यार्थीसुध्दा सराव करण्यास येथे रोज येतात. त्यांच्या पायाला रेती रुतून ईजा होऊ शकते. अनेक विद्यार्थी या ठिकाणी पाय घसरून जखमीही होत आहेत. रनिंग ट्रॅक तयार करताना याची काही नियमावली असते. त्याचे पालक होणे गरजेचे आहे. परंतु क्रीडा विभागाच्या नियमांची पूर्णपणे पायमल्ली होत असल्याचा आरोप अनेक क्रीडाप्रेमींनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावेजिल्हा क्रीडा संकुलाचा रनिंग ट्रॅक तयार करताना यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. पण प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमाकरिता या मैदानावर लाल माती टाकण्यात आली होती. हा प्रकार नियमबाह्य असून त्यामुळेच हा ट्रॅक खराब झाला आहे. हा ट्रॅक धावण्यायोग्य नसल्याचे मत क्रीडातज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जिल्हा क्रीडा समितीचे अध्यक्ष जिल्हधिकारी किरण गित्ते असून त्यांनी क्रीडाप्रेमींच्या मुद्यावर लक्ष घालून नियमाने चांगला ट्रॅक तयार करून द्यावा, अशी मागणी होत आहे. क्रीडा संकुलाचा रनिंग ट्रॅक नियमांने खेळण्यात किंवा धावण्यात योग्य नाही. लाल मातीच्या रेतीकणांमुळे अपघात होऊ शकतो. यापूर्वीसुद्धा क्रीडा विभागाला तक्रार दिली होती. - राजेंद्र पाटील, पदधिकारी क्रिडा परिषद अमरावती.