शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

सावधान, गाई, म्हशी मोकाट सोडताय, आता थेट ‘एफआयआर’च होणार!

By प्रदीप भाकरे | Updated: July 27, 2024 14:14 IST

महापालिका आयुक्तांचे निर्देश : वाहतुकीला अडचण निर्माण झाल्यास जनावरे जप्ती मोहिम

अमरावती: शहरातील विविध रस्त्यांवर, चौकात मोकाट गाई, गुरांचा कळप दृष्टीस पडतो. रस्त्यावर जनावरांनी मांडलेल्या ठिय्यामुळे अपघात देखील संभवतो. त्यापार्श्वभूमीवर आता आपले पशू मोकाट सोडणाऱ्यांविरूध्द थेट पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे. न्यायालयात दंड भरल्यानंतरच त्या पशुंची सुटका करण्यात येणार आहे. तसे निर्देश महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी दिले आहेत. महापालिकेचे पशुशल्यचिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे यांनी बैठकीदरम्यान शहरातील नोंदणीबध्द पशूंची संख्या व अनुषंगिक नियमांची माहिती दिली.

महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेमध्ये २६ जुलै रोजी महापालिका सभागृहात जनावरे पाळण्यासंबंधी नियमन तसेच सर्व उत्पत्ती नियंत्रण उपक्रमाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत महानगरपालिकेमार्फत उपद्रवी व मोकाट स्वरूपात असलेली जनावरे बंदिस्त करताना येणाऱ्या अडचणी व कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार यापुढे जनावरे मोकाट सोडत असताना वाहतूक पोलीस तथा संबंधित पोलीस स्टेशनची परवानगी घेेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जनावरे पाळण्यासंबंधीदेखील जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकाऱ्याचा परवाना देखील असणे अनिवार्य आहे. मात्र त्यासाठी देखील महानगरपालिकेची ना हरकत घ्यावी लागेल. जनावरे पाळण्यासंबंधी परवाना काढला नसल्यास जनावरे मोकाटसमजून महानगरपालिकेच्या पथकाद्वारे जप्त करण्यात येतील. तसेच ती पकडण्यात आलेली जनावरे व जनावर मालकांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम व कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच कोर्टासमोर जाऊन दंडात्मक कारवाई केल्यानंतर जनावरे सोडण्यात येतील, असे महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी स्पष्ट केले. 

मोकाट श्वानांबाबत हेल्पलाईनअलिकडे शहरात मोकाट श्वानांची संख्या वाढली असून, काही ठिकाणांहून तक्रारीदेखील प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने मोकाट श्वानांबाबत तक्रारीसाठी हेल्पलाइन गठित करण्यात आली असून, त्यात स्वास्थ निरिक्षक पंकज कल्याणकर, सागर मैदानकर व निलेश सोळंके यांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. जनावरासंबंधी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ८९, ९०, ९१, ९२, १०० व १०६ अन्वये अनधिकृत पशुपालनासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

नियम पाळून करा पशुपालनया बैठकीस पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी, वाहतूक पोलीस निरिक्षक रिता उईके, कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके, पोलीस निरीक्षक व्ही. एस आलेवार व समाधान वाटोळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नियम पाळूनच जनावरांचे पालन करावे. जेणेकरून उपद्रवी पशुपालनामुळे नागरिक, लहान मुलांची जीवित हानी वा अपघात होणार नाही, या सर्व बाबींवर उपयोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

टॅग्स :Amravatiअमरावती