शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सावधान ! घरात घुसून पाकिटातील पैसे लंपास करणारी टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 00:17 IST

महाविद्यालयात शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी गाडगेनगर परिसरात रुम भाड्याने घेऊन वास्तव्यास आहेत.

गाडगेनगरातील अनेकांना गंडविले :विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरणअमरावती : महाविद्यालयात शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी गाडगेनगर परिसरात रुम भाड्याने घेऊन वास्तव्यास आहेत. नेमकी ही बाब हेरुन विद्यार्थ्यांच्या घरात घुसून पॉकीट, पैसे, मोबाईल व अन्य साहित्य चोरणारी टोेळी सक्रीय झाली असून या टोळीने अनेक विद्यार्थ्यांना गंडविल्याच्या घटना घडल्या आहेत. विद्यार्थ्यांना गंडविल्याच्या घटना घडल्यानंतर याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार अथवा बयाण देणे याबाबीपासून दूर राहणे ते पसंत करतात. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसात तक्रार झाली नसलीे तरी काही विद्यार्थ्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गाडगेनगरात एका रुम मध्ये दोन ते तीन विद्यार्थी राहतात. येथील अनेक नागरिकांनी विद्यार्थ्यांसाठी रुम बांधून प्रति विद्यार्थी याप्रमाणे भाड्याने देण्याचा व्यवसाय थाटला आहे. भाड्याच्या रकमेपोटी घरमालकांनी आठ ते दहा खोल्या बांधल्या आहेत. एका घरमालकाकडे २० ते २५ विद्यार्थी वास्तव्यास आहेत. हीच संधी साधून काही अज्ञात तरुण चोरटे खोल्यांमध्ये प्रवेश करतात. नवीन विद्यार्थी असल्यामुळे आपसात अनेकांची ओळख नसते. त्यामुळे हा चोरटा नेमका कुणाकडे आला आहे. कुणाचा मित्र आहे. हे कळण्याचा आतच तो डल्ला मारुन आपला हात साफ करतो. महिन्याभरात तीन ते चार विद्यार्थ्यांसबोत हा प्रकार घडला आहे. मंगळवारी सायंकाळी एका विद्यार्थ्यांचे पॉकीट चोरीला गेले. त्यामध्ये हजार रुपये, वाहन परवाना, पॅन कार्ड व आधार कार्डसह महत्वाचे कागदपत्रं होती. चोरीच्या घटनेमुळे दर्यापूर येथे राहणाऱ्या विद्यार्थ्याला मनस्ताप सहन करावा लागला. या विद्यार्थ्याची परीक्षा सुरु असल्यामुळे त्याने पोलिसांत तक्रार देणे नाकारले. असाच प्रकार काही दिवसापूर्वी असाच प्रकार यापूर्वीही या परिसरात विद्यार्थ्यांसोबत घडला आहे. पोलिसात तक्रार दिली जात नसल्याने चोरट्यांचे फावत आहे.घरमालकांनी खोली भाड्याने देताना काळजी घ्यावीघराचे बांधकाम करायचे व नुसते विद्यार्थ्यांसाठी रुम काढायचे व त्यांना प्रती विद्यार्थी या प्रमाणे खोल्या भाडयाने द्यायच्या हा गाडगेनगरात अनेकांचा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला आपण खोली भाडयाने देतो त्यांच्यावर लक्ष ठेवणे ही घरमालकाचीही तितकीच जबाबदारी आहे. त्यामुळे अनोखळी युवकांना खोली भाड्याने देऊ नये त्यांच्यावर सुक्ष्म लक्ष ठेवणे गरजेचे आहे. खातरजमा केल्यानंतरच त्याला खोली भाड्याने द्यावी.