शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

'इर्विन'ची बत्ती गुल; मोबाईल टॉर्चवर रुग्णांवर उपचार; उकाड्यामुळे डॉक्टर, रुग्णांचे हाल

By उज्वल भालेकर | Updated: May 8, 2023 16:41 IST

Amravati News जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील काही वार्डातील तसेच बाह्यरुग्ण विभागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने डॉक्टर मोबाईल टॉर्चच्या उजेडात रुग्णांवर उपचार करत असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.

उज्वल भालेकर

अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील काही वार्डातील तसेच बाह्यरुग्ण विभागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने डॉक्टर मोबाईल टॉर्चच्या उजेडात रुग्णांवर उपचार करत असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे ही रुग्णालयासाठी नित्याची बाब झाली आहे. वीज नसल्याने रुग्ण, डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही नाहकत्रास सहन करावा लागला.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अपुऱ्या सोयीसुविधेमुळे रुग्ण तसेच नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशातच सोमवारी सकाळी ११ वाजतापासूनच रुग्णालयातील काही भागातील वीज पुरठा काही तांत्रिक बाबीमुळे बंद होता. त्यामुळे काही वार्डात उजेड तर काही वार्डांमध्ये काळाकुट्ट अंधार असल्याचे चित्र रुग्णालयात दिसून येत होते. महत्वाचे म्हणजे रुग्णालातील बाह्र रुग्ण विभागातही अंधार असल्याने अपघातग्रस्ता शिवाय इतर सर्वच रुग्णांवर मोबाईल टॉर्चच्या उजेडात उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आली होती. तब्बल पाच तासांपेक्षा अधिककाळ वीजपुरवठा हा खंडित राहिल्याने रुग्णांसह डॉक्टरांनाही गर्मीमुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.वारंवार वीज पुरवठा खंडित जिल्हा सामान्य रुग्णालयात वीज पुरवठा खंडित होण्याची बाब ही नित्याची झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर याठीकाणी तासंतास वीज पुरवठा राहत नाही. अशात रुग्णालयातील आयसीयू तसेच लहान मुलांच्या वार्डामध्येच जनरेटरची सुविधा असल्याची प्राथमिक माहिती आहे.रुग्णालयातील काही भागांमध्येच वीज पुरवठा हा खंडित झाला आहे. रुग्णालयाच्या मेंटनसची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने त्यांना माहिती दिली असून सकाळपासूनच कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम करत आहे.

डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय

टॅग्स :electricityवीजhospitalहॉस्पिटल