शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

प्रसाधनगृह, बस निवारा अतिक्रमणाच्या विळख्यात

By admin | Updated: July 22, 2015 00:48 IST

लाखो रूपये खर्चून बांधलेल्या महिलांच्या प्रसाधनगृहालगतच्या बस निवाऱ्याभोवती अतिक्रमणाचा विळखा पडल्याने महिला, प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहे.

महिला, विद्यार्थी, प्रवाशांचे हाल : पालिकेचे दुर्लक्षसुनील देशपांडे अचलपूरलाखो रूपये खर्चून बांधलेल्या महिलांच्या प्रसाधनगृहालगतच्या बस निवाऱ्याभोवती अतिक्रमणाचा विळखा पडल्याने महिला, प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. अचलपूर येथील गांधी पूल हा व्यापारीकरणाचा व शाळा, महाविद्यालयाचा केंद्रबिंदू आहे. या चौकात सतत वर्दळ असते. ग्रामीण भागातून शाळेत येणारे विद्यार्थी येथेच उतरतात. सायंकाळी ५ ते ७ वाजेच्या दरम्यान गांधी चौकात वर्दळ असते. पुलावरील रस्त्यावर बाजार भरतो. यासाठी पालिकेने लाखो रूपये खर्च करून पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे मुतारी घर बांधले आहे तर आमदार निधीतून एसटी बसचा निवारा बांधण्यात आला आहे. या दोघांना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. अतिक्रमण धारकांनी प्रसाधनगृहासमोर पानटपरी, चहा टपरी, हॉटेल लावून अतिक्रमण केले आहे तर बस स्टॉपसमोर बसस्टॉपला फळविक्रेत्यांनी घेरले आहे. अतिक्रमणाचा विळखा एवढा मोठा आहे की मुतारीघराकडे जाण्यासाठी एक फुटाचा रस्ताही गरजूला सापडत नाही त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्रवाशी व महिलांची गैरसोय होत आहे. पोलीस ठाणे आश्रयस्थानसायंकाळच्या वेळेस आपापल्या गावी विद्यार्थी व विद्यार्थिनी येथे मोठ्या वडाच्या झाडाखाली जमतात पण येथील दारूड्यांच्या धुमाकुळामुळे स्वत:च्या संरक्षणासाठी सरमसपूरा पोलीस स्टेशनच्या परिसरात आश्रयाला जातात. तेथील वऱ्हांड्यात बसतात प्रसंगी बऱ्याचदा तेथील शौचालयाचा उपयोग लघूशंकेसाठी करतात याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष असून हे अतिक्रमण त्वरीत काढून टाकावे यासाठी नगरसेवक प्रफुल्ल महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक सविस्तर निवेदन पाठविले असून २५ फूट अंतरापर्यंत संरक्षणाच्या दृष्टीने कठडे किंवा भिंत उभारावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी त्वरित पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून दिला आहे. गेल्या कित्येक दिवसापासून मूत्रीघर आणि बस स्टॉप अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने जनतेची गैरसोय होत आहे. सदर अतिक्रमण काढण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना अनेकदा सांगूनही ते दुर्लक्ष करीत असल्याने शेवटी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी व आयुक्तांना लेखी निवेदन पाठवले.- प्रफुल्ल महाजन, नगरसेवक.महाजन यांनी दिलेल्या तक्रारीची दखल आम्ही घेतली असून प्रथम मुतारीलगतच्या अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात येईल. तरीही ते न हटविल्यास पुढील कारवाई करु. तसे आदेशही बांधकाम विभागाला दिले आहेत. - धनंजय जावळीकर,मुख्याधिकारी, पालिका.