शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘सदेह वैकुंठ गमन’ पुस्तकावर बंदी आणा

By admin | Updated: August 10, 2016 00:04 IST

‘संत तुकाराम सदेह वैकूंठगमन’या पुस्तकात लेखक निवृत्ती वक्ते यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व युगप्रवर्तक ग्रंथ ग्रामगीतेवर वादग्रस्त लिखाण केले आहे.

मागणी : विविध संघटनांचे तहसीलदार, ठाणेदारांना निवेदनतिवसा : ‘संत तुकाराम सदेह वैकूंठगमन’या पुस्तकात लेखक निवृत्ती वक्ते यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व युगप्रवर्तक ग्रंथ ग्रामगीतेवर वादग्रस्त लिखाण केले आहे. या पुस्तकावर तत्काळ बंदी आणून 'त्या' लेखकावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी विविध संघटनांनी मंगळवारी तिवसा तहसीलदार व ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनात केली. निवृत्ती वक्ते यांनी 'संत तुकाराम महाराज सदेह वैकूंठगमन' या पुरस्तकात विकृत लिखाण केले. यामुळे लाखो गुरुदेवभक्तांच्या भावनेला ठेच पोहोचली. ग्रामगीतेला संडास साफ करणारी गीता, असे संबोधिले. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरदेखील अनेक खोटारडे व घाणेरडे आरोप करण्यात आलेले आहे. राष्ट्रसंतांची ग्रामगीता आदर्श ग्रंथ म्हणून घराघरांत वाचण्यात येते. मात्र या युगग्रंथावर टीका करीत लेखक निवृत्ती वक्ते यांनी दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या लेखकाने केला आहे. या समाजद्रोही लेखकाला तत्काळ अटक करावी व या पुस्तकावर तत्काळ बंदी आणावी, अशी मागणी तिवसा तहसीलदार व ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. यावेळी रवी खडतकर, संजय देशमुख, पवन दवंडे, भूषण यावले, दिलीप शापामोहन, जानराव मनोहरे, रामभाऊ टेकाडे, प्रमोद वाट, राज माहोरे, बाळाभाऊ देशमुख, सुरज दहाट, स्वप्निल उमप, आशिष कोल्हे, वीरेंद्र वानखडे, मोहन दरेकर, गौरव पोलाड, संदीप दहाट यांच्यासह लढा संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा विचारमंच, शिवगर्जना युवा संघटना, रतनगीर महागार गुरुदेव सेवा मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच या संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)