शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

बटाऊवाले हत्याप्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

By admin | Updated: November 7, 2015 00:18 IST

अमित बटाऊवाले हत्याकांडाला तीन महिने पूर्ण होण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असताना पोलिसांनी ...

पाच आरोपी अजूनही फरार : सात वाहने जप्तअमरावती : अमित बटाऊवाले हत्याकांडाला तीन महिने पूर्ण होण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असताना पोलिसांनी न्यायालयाला दोषारोपपत्र दाखल केल्याने जुळ्या शहरात असलेल्या उलटसुलट अफवेला पूर्णविराम मिळाला आहे. या हत्याकांडात सरकारची बाजू मांडण्यासाठी खासगी विशेष शासकीय अभियोक्त्याची नियुक्ती करण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. ११ आॅगस्ट रोजी अमित बटाऊवाले या युवकाची भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर हत्या करून त्याचे वडील मोहन यांनी गंभीर जखमी केले होते. यात पोलिसांनी नगरसेवक मो. शाकीर हुसेन, राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष मो. आबीद मुल हुसेन तसेच मो. आदाब मो. गुल हुसेन, मो. वाजीद अब्दूल रहेमान उर्फ बाबू साहेब, मो. तालीम मो. गुल हुसेन उर्फ बादशाह, अबेदखान मुजफ्फरखान, अन्सारखाँ नियामत खाँ, मो. शारीक वल्द अब्दुल रहेमान, मो. मतीन वल्द मो. जाफर, जिसानअली इत्यादींना अटक केली आहे.अफवांना पूर्णविराम९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल झाल्याने अचलपूर-परतवाड्यात पसरलेल्या वेगवेगळ्या अफवांना पूर्णविराम बसला आहे. पोलीस मॅनेज झाले. सेटिंग झाले, आरोपींना व्हीआयपी वागणूक आदी अफवांनी जोर धरला होता. पण पोलिसांनी अगदी वेळेचा विलंब न करता दोषारोपपत्र दाखल केल्याने अफवा तथ्यहीन ठरल्या आहेत. जामीन फेटाळलाअर्शद आणि अन्वर या दोघांनी गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला होता. पण न्यायालयाने तो फेटाळला होता. (प्रतिनिधी)