शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धि कॉरीडोर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आधार

By admin | Updated: August 25, 2016 00:12 IST

राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलविणारा व शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धि आणणारा....

बैठक : जिल्हाधिकाऱ्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शनधामणगाव रेल्वे : राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलविणारा व शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धि आणणारा मुंबई-नागपूर हा सुपर एक्सप्रेस हाय-वे शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे़ भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष प्रतापदादा अडसड यांनी शेतकरी व शासन यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका घेतली असून धामणगाव मतदारसंघात बैठकींना वेग आला आहे़मुंबई-नागपूर हा सुपर एक्सप्रेस हाय-वे तयार करण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पुढाकार घेतला आहे़ शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी व प्रकल्पाचे काम त्वरीत सुरू व्हावे, या संदर्भात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी झाडा, झाडगाव, आष्टा, चिंचोली या गावातील संबंधित शेतकऱ्यांची बैठक पंचायत समिती भवनात घेतली़ बैठकीला उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार चंद्रभान कोहरे यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती़ सन २०१३ च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे जमिनीच्या शासकीय भावानुसार पावणेचार पट मोबदला किंंवा भागीदारी पद्धतीमध्ये सहभागी झाल्यास भूखंड व दहा वर्षांपर्यंत शेतजमिनी प्रमाणेमोबदला असे पर्याय शेतकऱ्यांसमोर आहेत.विशेषत: आपल्याकडे सद्यस्थितीत असलेली शेतजमीन शेतकऱ्यांना विकण्यासाठी कोणतेही बंधन नाही. मात्र, भागिदारी पद्धत ही शेतकऱ्यांचे जीवन उंचविणारी आहे. मौजाप्रमाणे मूल्यांकन काढण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून शेतकऱ्यांना सर्व बाबींची माहिती देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी या बैठकीत सांगितले़धामणगाव मतदार संघातील नांदगाव खंडेश्वर व चांदूररेल्वे तालुक्यातील प्रत्येकी नऊ व धामणगाव तालुक्यातील पंधरा गावांतून हा प्रकल्प जाणार असल्याने शेतकऱ्यांना सर्वतोपरी माहिती मिळावी व प्रकल्पाचे काम गतीने सुरू व्हावे, याकरीता धामणगावसह चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर या दोन्ही तालुक्यांत बैठकी लावण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रताप अडसड यांनी दिली. शेतकऱ्यांनी कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नये, असे आवाहन प्रताप अडसड यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)