अनुदान : ग्राहकांना पुन्हा शेवटची संधीअमरावती : गॅस ग्राहकांना पुन्हा एकदा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंकअप करण्याचा ससेमिरा पूर्ण करावा लागत आहे. यापुढे प्रत्येक ग्राहकांच्या खात्यावरच सिलिंडरचे अनुदान जमा होणार आहे.त्यामुळे ज्याच्याकडे अद्यापपर्यंतही आधारकार्ड नाही अशा ग्राहकांना गॅस कंपन्यांनी एलपीजीआयडी उपलब्ध केला आहे. हा क्रमांक ग्राहकांनी त्यांच्या बँक खात्याशी लिंकअप करून घेणे गरजेचे आहे. येत्या १ जानेवारी २०१५ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. याकडे दुर्लक्ष करणारे गॅस ग्राहक नव्या वर्षात अनुदानापासून वंचित राहण्याची भीती आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी गॅस कनेक्शनची तपासणी झाली. यामध्ये एकापेक्षा अधिक गॅस कनेक्शन असलेल्यांची कनेक्शन रद्द करण्यात आली. काही ग्राहकांनी स्वत:हून जादा गॅस कनेक्शन परत केले त्यानंतर गॅस ग्राहकांना सवलतीत मिळणारे सिलिंडर अनुदान थेट खात्यावर जमा करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी गॅस ग्राहकांना आपला गॅस एजन्सी क्रमांक आधारकार्ड क्रमांक बँक खात्याशी लिंकअप करावे लागले. त्यासाठी गॅस ग्राहकांच्या लांबच लांब रांगा गॅस एजन्सीत लागत होत्या. गॅस सिलिंडर अनुदान थेट खात्यावर जमा होणार असल्याने अनेकांनी खटाटोप करून आधार नोंदणी करून घेतली. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून या खात्याशी गॅस ग्राहक क्रमांक लिंकअप करून घेतला त्यानंतर लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने ही प्रक्रिया थोडी मंदावली आणि त्यानंतर थांबली मग यातून मार्ग काढण्यासाठी ज्यांचे खाते लिंकअप झाले आहे अशांच्या खात्यावर अनुदान जमा होऊ लागले ज्यांनी लिंकअप केलेले नाही त्यांना मात्र अनुदान वजा कॅन सिलिंडर नेहमीच्याच दराने देण्यात येऊ लागले. ज्यांनी लिंकअप केलेले नाही त्यांना मात्र अनुदान वजा कॅन सिलिंडर नेहमीच्याच दराने देण्यात येऊ लागले. मध्यंतरीच्या काळात आधार नोंदणीत जिल्ह्यात गोंधळ झाला त्यातच विधानसभा निवडणूक आल्याने ही प्रक्रिया पुन्हा थांबली. आता सरत्या वर्षाला निरोप देताना पुन्हा एकदा गॅस ग्राहकांना आधार क्रमांक आणि बँक खात्याशी गॅस खाते लिंकअप करण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. ज्या ग्राहकांनी मागील वर्षी या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले त्यांच्यासाठी ही प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८० टक्के गॅस ग्राहकांचे आधार क्रमांक गॅस एजन्सीकडे उपलब्ध आहेत. मात्र बँक खात्याशी आधार व गॅस कनेक्शनचे लिंकअप करण्याची प्रक्रीया ७५ टक्केच पूर्ण झालेली आहे. नव्या वर्षात सर्व गॅस ग्राहकांचे सिलिंडर अनुदान खात्यावरच जमा केले जाणार आहे. त्यासाठी उर्वरित ग्राहकांसाठी ही प्रक्रिया सुरू झाली आहे. पण यावेळेस ज्या ग्राहकांकडे आधार कार्डच नाही अशा ग्राहकांनी गॅस कंपन्यानीच एलपीजीआयडी क्रमांक उपलब्ध केला आहे. हा क्रमांक ग्राहकांना त्यांच्या अधिकृत नोंदणी केलेल्या मोबाईलवर एसएमएस करण्यात आलेला आहे. हा क्रमांक घेऊन ग्राहकांनी गॅस एजन्सीजमध्ये जाऊन एक फॉर्म अर्ज खाते असलेल्या बँकेत द्यायचा आहे. त्यानंतर या ग्राहकांचे सिलिंडर अनुदान खात्यावर जमा होणार आहे. पण ज्याच्याकडे आधार कार्ड आहे पण त्यांनी लिंकअप केलेले नाही त्यांना ते लिंकअप करून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना गॅस सिलिंडरच्या अनुदानासाठी आता मोजकाच अवधी शिल्लक असल्याने यासाठी धावपळ करावी लागणार आहे. आधार कार्ड नसले तरी बँक खाते नंबर देणे आवश्यक आहे.
गॅस सिलिंडर अनुदानासाठी बँक खाते नंबरचा आधार
By admin | Updated: December 16, 2014 22:44 IST