शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही', अज्ञातांकडून बॅनरबाजी  

By प्रदीप भाकरे | Published: March 16, 2024 6:37 PM

‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही!’ अशा फलकबाजीने शहरातील राजकीय वातावरण कमालिचे तापले आहे.

अमरावती: ‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही!’ अशा फलकबाजीने शहरातील राजकीय वातावरण कमालिचे तापले आहे. राणांच्या पीएंच्या तक्रारीवरून त्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी एका मुद्रकासह काही अज्ञातांविरूध्द बदनामी व मालमत्ता विरूपणाचा गुन्हा दाखल केला. तेवढ्याच तत्परतेने राजापेठ व सिटी कोतवाली पोलिसांनी ते फलक काढून नेले. पोलिसांनी संपुर्ण रात्रभर त्या फलकांची सर्चिग चालविली होती.

शुक्रवारी रात्री ९ ते ९.३० च्या पुढे राजापेठ उड्डाणपुलासह राजकमल, जयस्तंभ व इर्विन चौकात ‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही!’ अशी फलके लागल्याचे पाहावयास मिळाले. ती बाब खुपियामार्फत माहिती पडताच कोतवाली, राजापेठ पोलिसांनी तातडीने तिकडे धाव घेत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, बिघडण्यास कारण मिळू नये, यासाठी ते फलक काढले. कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके, राजापेठचे ठाणेदार महेंद्र आंबोरे यांनी तत्काळ फलकस्थळ गाठले. त्याचबरोबर अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील तशी फलके लागली असेल, तर काढण्याचे आदेश देण्यात आले. 

त्यायोगे, संपुर्ण शहरात सर्चिंग करण्यात आले. खासदार नवनीत राणा या पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्या यावेळची निवडणूक कमळावर लढतील, असे स्पष्ट संकेत आहेत. ते ठरविण्यासाठी शनिवारी सायंकाळी युवा स्वाभिमानींचा मेळावा देखील आयोजित होता. त्याआधीच काही अज्ञात लोकांनी ‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही‘, ‘मी अमरावतीकर’ अशी पोस्टरबाजी करत नवनीत राणांची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे. खासदार राणा भाजपकडून निवडणूक लढणार, अशी माहिती शनिवारी दुपारी अमरावती लोकसभा मतदारसंघात पसरली. त्यानंतर सायंकाळी राणांविरोधात ही पोस्टरबाजी करण्यात आली. असा आहे संदर्भपाच वर्षांपुर्वी नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरुन निवडून आल्या. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. अलिकडे तर त्यांच्या बॅनर पोस्टरवर देखील मोदी शहांच्या छबी झळकत आहेत. शिवाय, यंदाची लोकसभा निवडणूक त्या भाजपकडून लढवतील, असे चित्र दृष्टीस पडते आहे. मात्र,स्थानिक भाजपमधील अनेक बड्या नेत्यांचा राणांना विरोध आहे. भाजपसोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्याशी असलेले राणांचे विळ्या भोपळ्याचे सख्य अमरावती जिल्ह्यात सर्वश्रूत आहे. त्या अनुषंगाने ‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही!’ असे फलक लावण्यात आले असावेत, अशी राजकीय चर्चा शहरात रंगली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीnavneet kaur ranaनवनीत कौर राणाNarendra Modiनरेंद्र मोदी