शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एसबीआय खातेदारांचे दिल्लीतून काढले बँक स्टेटमेंट, पैसे परस्पर लंपास, एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 18:21 IST

सायबर गुन्हेगारांनी दिल्लीत बसून स्टेट बँकेच्या अमरावती येथील खात्यांचे बँक स्टेटमेंट मिळवून खातेदारांचे पैसे परस्पर काढले. गुडगावातील ज्या एसबीआयच्या एटीएममधून सायबर गुन्हेगारांनी रक्कम काढली, त्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

अमरावती : सायबर गुन्हेगारांनी दिल्लीत बसून स्टेट बँकेच्या अमरावती येथील खात्यांचे बँक स्टेटमेंट मिळवून खातेदारांचे पैसे परस्पर काढले. गुडगावातील ज्या एसबीआयच्या एटीएममधून सायबर गुन्हेगारांनी रक्कम काढली, त्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६ जणांच्या एसबीआय बँक खात्यातून तब्बल १४ लाखांची रक्कम लंपास करण्यात आली आहे. एटीएममध्ये स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती चोरण्यात आली. त्या माहितीच्या आधारे एटीएम क्लोन करून हरियाणा राज्यातील गुडगावातून पैसे काढण्यात आल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. त्या अनुषंगाने अमरावतीचे सायबर सेलचे पोलीस गुडगावात पोहोचले. स्टेट बँकेच्या ज्या एटीएममधून सायबर गुन्हेगार पैसे काढत आहेत, त्या एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजची पोलीस तपासणी करीत असून, ज्या वेळी रक्कम विड्रॉल झाली, त्या वेळेला एटीएममध्ये कोण होते, याची पडताळणी होत आहे. 

गुडगावातील सीसीटीव्ही फुटेज सायबर टीमने ताब्यात घेतले आहे. दिल्लीत बसून गुन्हेगारांनी अमरावतीमधील खातेदारांच्या खात्यात किती रोख आहे, हे पडताळून रोख काढल्याचे निदर्शनास आले आहे. दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.

टॅग्स :Amravatiअमरावतीbankबँक