शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दोन शिक्षिकांकडून बॅंकेची २० लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST

त्या कर्ज अर्जामध्ये को-अप्लिकंट म्हणून अन्य एका महिलेनेदेखील तसाच अर्ज सादर केला होता. त्या अर्जाप्रमाणे दोन्ही महिलांना बँकेने १९ लाख १२ हजार ५०० रुपये कर्ज मंजूर केले होते व खात्यात जमा केले. दरम्यान, बँकेच्या स्थानिक मासोद तपोवन शाखेलादेखील एका शाळेची खोटी कागदपत्रे देऊन त्या दोन महिलांनी कर्जाची मागणी केल्याचे लक्षात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कारंजा लाड तालुक्यातील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याची बतावणी करून दोन शिक्षिकांनी साईनगरस्थित बॅंक ऑफ महाराष्ट्रची १९ लाख १२ हजार ५०० रुपयांनी फसवणूक केली. याबाबत बॅंकेचे अंचल प्रबंधक अनिल गिरसावळे (५४, रा. कठोरा रोड) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी चांदूर रेल्वे व बिच्छूटेकडी, अमरावती येथील दोन महिलांविरुद्ध कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला. १२ फेब्रुवारी २०२१ ते १७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ही घटना घडली.तक्रारीनुसार, फिर्यादी हे साईनगर येथील महाराष्ट्र बँक येथे अचल प्रबंधक म्हणून कार्यरत असून, त्यांच्या बँकेत एका महिलेने गृहकर्जाकरिता अर्ज केला होता. त्यादरम्यान आरोपीने शिक्षक असल्याचे भासवून २०१७ ते २०२० चे १६ नंबरचे फाॅर्म बँकेत दाखल केले. त्यासंबंधाने पत्ता व ओळख लागणारी कागदपत्रे विद्याभारती माध्यमिक विद्यालय, शहा (कारंजा लाड, जि. वाशिम) या संस्थेचे ओळखपत्र, वेतन प्रमाणपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड अकोला, डी अकोला डिस्ट्रीक सेंट्रल ऑफ लि, शाखा कारंजालाडमधील खाते क्र. ०७१०८२२०२००३९८३५ चे विवरण सादर केले होते.त्या कर्ज अर्जामध्ये को-अप्लिकंट म्हणून अन्य एका महिलेनेदेखील तसाच अर्ज सादर केला होता. त्या अर्जाप्रमाणे दोन्ही महिलांना बँकेने १९ लाख १२ हजार ५०० रुपये कर्ज मंजूर केले होते व खात्यात जमा केले. दरम्यान, बँकेच्या स्थानिक मासोद तपोवन शाखेलादेखील एका शाळेची खोटी कागदपत्रे देऊन त्या दोन महिलांनी कर्जाची मागणी केल्याचे लक्षात आले. सबब, बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकाळात सर्व कर्ज प्रकरणांची पडताळणी करून पाहिले असता, दोन्ही महिलांनी तेथेदेखील १६ नंबरचे फाॅर्म व शाळेचे बनावट शिक्के मारून त्याद्वारे बँकेकडे गृहकर्ज मिळण्याकरिता अर्ज सादर केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोन्ही महिलांनी बनावट कागदपत्रे देऊन बॅंकेची फसवणूक केल्याची तक्रार १७ फेब्रुवारी रोजी दुपारी नोंदविण्यात आली आहे.

 

टॅग्स :fraudधोकेबाजी