शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

काळाच्या ओघातही बदलली नाहीत बंजारा स्त्रियांची आभूषणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 13:38 IST

आधुनिक काळाची चिन्हे मानवाच्या दैनंदिन आयुष्यात जागोजागी दिसत असली तरी अमरावती जिल्ह्यातील बंजारा समाजातील स्त्रियांच्या जीवनपद्धतीवर कुठलाच परिणाम नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देपोशाख, खानपानात आधुनिकतेचा लवलेशही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आधुनिक काळाची चिन्हे मानवाच्या दैनंदिन आयुष्यात जागोजागी दिसत असली तरी अमरावती जिल्ह्यातील बंजारा समाजातील स्त्रियांच्या जीवनपद्धतीवर कुठलाच परिणाम नसल्याचे दिसून येत आहे. आधुनिक काळाशी सुसंगत राहणीमान स्त्रियांनी अंगीकारले, तशा त्यांच्या शरीरावर असणारे दागिने कमी-कमी व्हायला लागले. बंजारा समाजातील स्त्रिया मात्र दागिन्यांचा सोस कमी करायला तयार नाहीत. किंबहुना, मेल्यावरच अंगावरील दागिने उतरतील, असा त्यांचा ठाम निश्चय असतो.स्त्रियांच्या गळ्यातील आभूषणे भारतीय संस्कृतीत सौभाग्याची प्रतीकं आहेत. तरी अशी एकही स्त्री नाही जिला दागिन्यांचं आकर्षण नाही. दागिन्यामुळेच स्त्रीचे सौंदर्य खुलते व त्यामुळेच दागिन्यांच्या दुनियेत नावीन्य पाहायला मिळते. परंतु, पूर्वापार चालणाऱ्या परंपरेनुसार बंजारा समाजातील स्त्रियांच्या गळ्यातील आभूषणे प्राचीन इतिहास सांगणाऱ्या नाण्यांच्या माळा एक नवलाईच म्हणावी लागेल.आधुनिक युगाचा स्वीकार करताना रूढी, परंपरा व वेशभूषा यात झपाट्याने बदल होताना दिसून येतो. परंतु, काही समाजांमध्ये बहुतांश परंपरा, राहणीमानात विशेष बदल जाणवत नाही. त्यांच्यापैकी एक घटक म्हणून बंजारा समाजाचा समावेश होतो. त्यांचे खानपान, वेशभूषा, संस्कृती, पोशाख आदी गोष्टींना आधुनिकतेचा लवलेश दिसून येत नाही.बंजारा समाजातील स्त्रियांच्या अंगावरील पोषाखामध्ये घागरा (फेटिया), अंगावर चढविण्याचा गोळका (काचळी) डोक्यावरील ओढणी अन् साथ लाभते ती वजनदार चांदीच्या दागिन्याची. ज्यात कान व डोक्याच्या मधल्या झुबक्याची टोपली, केसातील ओटी, मनगटापासून थेट ढोपरापर्यंत हस्तीदंती बांगड्या (बाल्या), दंडावरील बायटा अशा नखशिखांत आभूषणात सजलेली बंजारा स्त्री समाज संस्कृतीचे जतन करताना आढळते. पूर्वापार सोन्याच्या दागिन्यांचे अस्तित्व आहेच, परंतु बदलत्या काळात यात भर पडली ती इमिटेशन, बेंटेक्स अशा ज्वेलरीची टिकलीपासून पायातील जोडवी, मासळी आढळते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक