शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

रंगविलेल्या नोटांवर बंदी

By admin | Updated: March 11, 2017 00:02 IST

होळीचा रंग लागलेल्या नोटा न स्वीकारण्याचे धोरण आरबीआयने जाहीर केले आहे.

आरबीआयचे निर्देश : आदिवासींच्या अज्ञानाचे काय ? अमरावती : होळीचा रंग लागलेल्या नोटा न स्वीकारण्याचे धोरण आरबीआयने जाहीर केले आहे. मेळघाट प्रांतातील निरक्षर आदिवासी या निर्णयापासून अनभिज्ञ असल्यामुळे ‘फागुन’ उत्सवात रंगणाऱ्या त्यांच्याकडील नोटांचे काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. धारणी, चिखलदरा आणि अचलपूर तालुक्यातील काही भागात एकूण लोकसंख्येच्या ७५ टक्के आदिवासी आहेत. ही संख्या साधारणत: अडीच लाखांच्या घरात आहे. प्रशासनाने करावी कारवाईअमरावती : यापैकी बहुतांश लोकांची जिविका वनउपज, शेती अथवा अंगमेहनतीच्या कामांवर अवलंबून आहे. साक्षरतेचे प्रमाण नगण्य आहे. नोटाबंदी आणि त्याअनुषंगाने आरबीआयचे विविध नियम, कायदे याबाबत आदिवासी सतर्क नाहीत. नव्या चलनाबाबत रंगबंदीचा नियमही आदिवासींसाठी अपरिचित आहे. होळी हा आदिवासी समाजाचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. ते पाच दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मेळघाटात रोजगाराची साधने नसल्याने पोटाची खळगी भरण्याकरिता कामानिमित्त इतरत्र गेलेले आदिवासी या सणाला आवर्जुन घरी परततात. या उत्सवाला ते फागून, असे संबोधतात. रस्त्यावरील मुशाफिरांना अडवून फगवा (पैशांच्या स्वरुपातील बक्षीस) मागणे हा त्यांचा परंपरागत हक्कच आहे. नैसर्गिक रंगाने होळी खेळणाऱ्या आदिवासींकडील नोटा रंगण्याची शक्यता अतिशय दाट आहे. नोटांच्या रंगबंदीबाबत शासन-प्रशासनाने आदिवासींमध्ये जागृती मोहीम राबविलेली नाही. वर्षभर राबराब राबून आदिवासींनी कमविलेले चलन केवळ अज्ञानामुळे बाद होणार असेल तर त्याची जबाबदारी कुणाची, हा गंभीर प्रश्न अनुत्तरित आहे. रंगलेल्या किंवा लिहिलेल्या नोटा न स्वीकारण्याचे निर्देश आरबीआयने सर्व बँकांना दिले आहेत. त्याला आम्ही बांधील आहोत. लोकजागृतीसंबंधीचे कुठलेही निर्देश नाहीत. - सुनील रामटेके व्यवस्थापक, अग्रणी बँक अमरावती. क्लिन पॉलिसी नोटबंदीनंतर रिझर्व बँकेने नवीन चलन स्वच्छ आणि निटनेटके ठेवण्यासाठी ‘क्लिन पॉलिसी’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन चलनावर त्यामुळेच रंग चालणार नाही. ‘कॅशलेस’ होळी खेळणे हा उत्तम पर्याय आहे.