शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती शहरात ऑनलाईन शस्त्र खरेदीस प्रतिबंध

By प्रदीप भाकरे | Updated: October 11, 2024 18:50 IST

पोलीस आयुक्तांचा आदेश : गुन्ह्यात चायना चाकुचा वापर वाढल्याने कंपनींनाही नोटीस

प्रदीप भाकरे अमरावती : शहरात ऑनलाईन शस्त्र खरेदीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी ११ ऑक्टोबर रोजी तो आदेश काढला असून, तो पुढील ६० दिवसांकरीता लागू असेल. शहरात अलिकडे झालेल्या खुनाच्या सलग तीन घटनांमध्ये चायना चाकू वापरला गेला. त्यापुर्वी राजापेठ हद्दीत सलग झालेल्या दोन खुनात देखील चायना चाकू वापरला गेला. त्यापाश्वभूमिवर तो प्रतिबंध आदेश काढण्यात आला आहे.           

अलिकडे फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, शॉपक्लुज डॉट कॉम या कंपन्या आपल्या ई कॉमर्स प्लॅटफार्महून धारधार शस्त्रे, जी गुन्हयांमध्ये वापरले जाऊ शकतात, अशा शस्त्रांची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. त्याला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ प्रमाणे आदेश पारीत केला आहे. या आदेशान्वये फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, शॉपक्लुज डॉट कॉम या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्महून तिक्ष्ण धार असलेले प्राणघातक शस्त्र ज्याच्या पात्याची लांबी नऊ इंचापेक्षा जास्त किंवा ज्याच्या पात्याची रुंदी २ इंचापेक्षा जास्त असेल, ज्याचे बाळगणे हे भारतीय हत्यार कायदा कलम ४ सहकलम २५ अन्वये दखलपात्र गुन्हा होत असल्याने अशा शस्त्र विक्रीवर अमरावती शहरात बंदी घालण्यात आली आहे.

यांची मागितली माहितीज्यांची लांबी नऊ इंचापेक्षा कमी व रुंदी दोन इंचापेक्षा कमी असलेल्या शस्त्रांची ऑनलाइन खरेदी करण्या-या अमरावती शहरातील ग्राहकांची विस्तृत तपशीलासह माहिती अमरावती शहर पोलिसांना वेळोवेळी पुरविण्याबाबत देखील संबंधित इ कॉमर्स कंपन्यांना आदेशित करण्यात आले आहे.

शस्त्रखरेदी करणा-यांची माहिती मागवलीई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून शस्त्रखरेदी करणा-या शहरातील व्यक्तीचे नाव, पत्ता, शस्त्राचा प्रकार, फोटो व इतर आवश्यक माहितीमिळवून ती सादर करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. शहरातील काही गंभीर गुन्ह्यातील आरोपींनी ऑनलाईन शस्त्र विकत घेतल्याचे आढळले. अशा शस्त्र विक्रीमुळे शहरात गुन्हेगारांना घरपोच शस्त्र उपलब्ध होत असून, गुन्हेगारीस पाठबळ मिळू शकते. त्यामुळे हा आदेश पोलीस आयुक्तांकडून जारी करण्यात आला.

"सर्व ऑनलाईन शस्त्रांची विक्री करणा-या कंपन्यांना नोटीस देण्यात आली आहे. शहरात ऑनलाईन शस्त्र खरेदीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. आयुक्तालयातील दहाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो आदेश लागू राहिल. तसेच पोलिसांतर्फे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरूध्द मोहिम हाती घेण्यात आली आहे."- नवीनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त 

टॅग्स :Amravatiअमरावती