शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धूलिकण कमी करण्यास गिट्टीची मलमपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:25 IST

राजापेठ उड्डाणपूल निर्मितीच्या प्रक्रियेमुळे पर्यायी मार्गावर वाढलेल्या धूलिकणांवर उपापयोजना म्हणून गिट्टीची मल्लमपट्टी लावण्यात आली आहे.

ठळक मुद्देअमरावतीकरांना थोडा दिलासा : डांबरीकरणाचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजापेठ उड्डाणपूल निर्मितीच्या प्रक्रियेमुळे पर्यायी मार्गावर वाढलेल्या धूलिकणांवर उपापयोजना म्हणून गिट्टीची मल्लमपट्टी लावण्यात आली आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात धूलिणांपासून अमरावतीकरांना दिलासा मिळाला आहे. या मार्गाचे लवकरच डांबरीकरण केले जाणार असल्याचे संकेत महापालिका प्रशासनाकडून मिळाले आहेत.शहरात धूलिकणांचा वाढता प्रकोप अमरावतीकरांना श्वसन आजाराच्या विळख्यात ढकलत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात 'उड्डाणपुलाची डोकेदुखी' या वृत्तमालिकेतून ‘लोकमत’ने लोकदरबारी वृत्तांकन केले. याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने उपाययोजनांसाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिका प्रशासनाने राजापेठ उड्डाणपुलाजवळील पर्यायी मार्गावर गिट्टी टाकण्यास सुरुवात केली असून, एका मार्गाचे बहुतांश खड्डे बुजविले आहेत. दुसºया मार्गावरही गिट्टी टाकून खड्डे बुजविले जाणार आहेत. त्यानंतर पुढील उपाययोजनेत डांबरीकरणांचे काम सुरू केले जाण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच राजापेठ उड्डाणपुलाजवळील मार्गावरील धूलिकणांचा स्तर अत्यंत विरळ होणार असून, अमरावतीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.ब्ल्यू प्रिन्ट तयारमहापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्या निर्देशाप्रमाणे पर्यावरण विभागाने ६ नोव्हेंबर रोजी बैठक बोलाविली आहे. या बैठकीत धूलिकणावरील उपाययोजनांवर विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी चर्चा करून तोडगा काढणार आहेत. यासंबंधाने नियोजनाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.धूलिकणांविषयी ६ नोव्हेंबरला बैठक बोलाविण्यात आहे. यासंबधाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार असून, खड्डे बुजवून लवरकच डांबरीकरणाची कामे केली जाणार आहे.- महेश देशमुख,पर्यावरण सवंर्धन अधिकारी.खड्डे बुजविण्यासाठी सर्वप्रथम गिट्टीचे पॅचेस टाकण्यात येत आहे. लेव्हल मिळाल्यानंतर डांबरीकरणाचेही काम सुरू होईल. पंधरा दिवसांत काम पूर्ण करणार आहे.- जीवन सदार,अतिरिक्त शहर अभियंता.